‘त्यांचे सदाआवडते लोक आहेत, ते…’; वकील सदावर्तें यांच्यावरून ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

‘त्यांचे सदाआवडते लोक आहेत, ते…’; वकील सदावर्तें यांच्यावरून ठाकरेंचा फडणवीसांवर निशाणा

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी 24 ऑगस्ट 2024 ला महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. मविआमधील सर्व नेत्यांनी या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं होतं. या बंदविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती. यावर तातडीने सुनावणी करत मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर असल्याचं सांगत जर कोणी बंद केला तर राज्य सरकारने कारवाई करावी असे आदेश दिले होते. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत बंद मागे घेत असल्याचं सांगितलं. यावेळी ठाकरेंनी बंदविरोधात याचिका दाखल करणाऱ्या सदावर्तेंवरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला.

खरंतर याचिकाकर्त्याने या कारणासाठी कोर्टात जायला नको होतं. जिथे आई बहि‍णींचा विषय येतो तिथे त्यांनी संवेदनशील व्हायला हवं होतं. आता उद्या जर कुणावर अत्याचार झाला तर त्याची जबाबदारी याचिकाकर्ते आणि कोर्टावर असेल. त्यांचे काही सदाआवडते लोक आहेत. ते नेहमी कोर्टात जातात आणि निर्णय घेऊन येतात. मागे मराठा आरक्षणाच्या विरोधातही ते गेले होते, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला.

बंद आम्ही उद्याच जाहीर केला होता. पवारसाहेब आणि पटोले बाहेर आहेत. त्यामुळे एकत्र बसून निर्णय घेऊ शकलो नाही. फोनवरून बोलणं झालं. पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. उद्या परवा आम्ही बसून चर्चा करू. भविष्यात बंद करणार नाही, असं नाही. संप करणं हा लोकशाहीचा अधिकार आहे. पुन्हा सांगतो, कोर्टाचा निर्णय मान्य नाही.पण कोर्टाचा आदर करून आम्ही निर्णय स्वीकारत आहोत. पण आम्ही बंद करणार नाही. आंदोलन करूनच स्वातंत्र्य मिळालं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आंदोलन करायचं नाही. तेही महिलांविरोधातील अत्याचारांविरोधात आंदोलन करायचे नाही. हे काही पटत नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;