मुंबई वन मेट्रोने गाठली तब्बल एक अब्ज प्रवासी संख्या, 264 दिवसात केला विक्रम

मुंबई वन मेट्रोने गाठली तब्बल एक अब्ज प्रवासी संख्या, 264 दिवसात केला विक्रम

घाटकोपर ते वर्सोवा धावणाऱ्या मुंबई वन मेट्रोने तब्बल एक अब्ज म्हणजे 100 कोटी प्रवासी संख्येचा पल्ला गाठला आहे. हा विक्रम मुंबई वन मेट्रोने अवघ्या 264 दिवसात केला आहे. मुंबईला पूर्व ते पश्चिम जोडणाऱ्या मुंबईतील पहिल्या वहिल्या मुंबई वन मेट्रोची सुरुवात दहा वर्षांपूर्वी 8 जून 2014 रोजी झाली होती. या मेट्रोमुळे पूर्व उपनगरातून पश्चिम उपनगरात जाण्यासाठी जलद मार्ग उपलब्ध झाला आहे.या मार्गावर मुंबई वन मेट्रो बांधायला मात्र अनेक वर्षे खर्ची लागली होती. या वर्षात मुंबई वन मेट्रोने प्रवाशांना चांगली सेवा दिली असून तिची लोकप्रियता पश्चिम उपनगरात मेट्रो – 7 आणि मेट्रो – 2  अ ( Metro 2  A & 7 )  सुरु झाल्यानंतर आणखीनच वाढली आहे.

मुंबई वन मेट्रोचा ( Mumbai Metro One )कारभार रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्टर ( Reliance Infrastructure ) या कंपनीकडे असून हा देशातील पहिला खाजगी आणि सरकारी सहभागातून बांधलेला पीपीपी मॉडेलाचा प्रकल्प आहे. मुंबई मेट्रोवननेमध्ये अनेक प्रवाशांच्या उपयोगाच्या सुविधा सुरु केलेल्या आहेत.

* कोरोनामुळे 211 दिवस मेट्रोच्या गाड्या बंद होत्या 31 मार्च 2022 पर्यंत लोकडाऊनमुळे मेट्रो सेवा बंद होती

विक्रमाची तारीख प्रवाशाची संख्या दशलक्षमध्ये किती दिवसात रेकॉर्ड केला
10 जुलै 2015100398
1 ऑगस्ट 2016 200388
4 जुलै 2017 300337
30 एप्रिल 2018 400300
28 जानेवारी 2019500273
19 ऑक्टोबर 2019600264
1 मार्च 2022700864*
24 फेब्रुवारी 2023 800

360
02 डिसेंबर 2023

900281
22 ऑगस्ट 24

1000264

दर 3.5 मिनिटांनी एक ट्रेन

मुंबई वन मेट्रोमधून सध्या दररोज 430 फेऱ्या चालवून सोमवार ते शुक्रवार अशी दररोज 5 लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते. पिक अवरला दर 3.5 मिनिटांनी एक ट्रेन सोडली जाते. तर नॉन – पिक अवरला दर 7 मिनिटांनी एक ट्रेन चालविली जाते. Mumbai Metro One मधून दररोज प्रवाशांची संख्या वाढतच आहे. मुंबई मेट्रो वन प्रवाशांना वर्ल्ड क्लास अनुभव प्रवाशांना देत असून वक्तशीरपणाही 99 टक्के वक्तशीपपणा मुंबई वन मेट्रोने राखलेला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;