मेट्रो गर्डरचा गणेशमूर्तींना होतोय अडथळा, मेट्रो 2 -बी गर्डरची उंची वाढविण्याची मागणी, MMRDA विमानतळ प्राधिकरणाला लिहीणार पत्र ?
मेट्रो- 2 बी गर्डरची उंची वाढविण्यासाठी एमएमआरडीएने विमानतळ प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करण्याचा निर्णय घेतला आहे. या मेट्रो 2 बी गर्डरमुळे या हलाव पुलावरुन जाणाऱ्या गणेशमूर्तींना अडथळा होऊ शकतो असे गणेशमंडळाचे म्हणणे होते. या संदर्भात नुकतिच नागरिकांची एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकी दरम्यान एमएमआरडी प्रशासनाने या संदर्भात विमानतळ प्राधिकरणाशी पत्र व्यवहार करण्याचे आश्वासन दिलेले आहे.
मेट्रो -2 बी गर्डरची उंची सध्या हलावपुलावर 3.50 मीटर आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रौत्सव दरम्यान या मार्गाचा वापर वाहतुकीसाठी केला जातो. त्यामुळे येथून गणपती आणि देवीच्या मूर्ती नेण्यास अडथळा निर्माण झाला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुद्दा उपस्थित केला की मेट्रो – 2 बी चा मार्ग बदलला नसता तर ही वेळ आली नसती. मार्ग बदलताना नागरिकांच्या तक्रारी आणि हरकती मागवल्या असतील तर त्याची माहिती एमएमआरडीएने द्यावी अशीही मागणी त्यांनी केली आहे. मेट्रो-2 बी मार्गिकेच्या गर्डरला 3.50 मीटर उंचीची परवानगी 2017 रोजी मिळालेली आहे. एमएमआरडीएने आता पुन्हा एकदा भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे येथे उंचीची परवानगी 5.50 मीटर पर्यंत करण्याची मागणी करावी असेही ते म्हणाले. यामुळे भविष्यात मेट्रोला सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून काहीही चिंता राहणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
उमेश गायकवाड यांनी कुर्ल्यातील बदलत्या भौगोलिक स्थितीचा आढावा घेत मार्ग बदल करण्यास तीव्र विरोध केला आणि कुर्ल्यातील नागरिकांनास एमएमआरडीएने प्रत्येक वेळी गृहीत धरण्याची मानसिकता बदलावी अशी मागणी केली. ही चर्चा झाल्यानंतर मुंबई महानगर पालिकेचे अधिकारी जीवन राठोड यांनी या सर्व मागण्याबाबत एमएमआरडीए अधिकारी वर्गास सूचना केल्या. तर एमएमआरडीएचे अधिकारी धोत्रे यांनी मेट्रो- 2 बी गर्डरची उंची वाढविण्यासाठी एमएमआरडीए विमानतळ प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करेल असे आश्वासन दिल्याचे अनिल गलगली यांनी सांगितले. याप्रसंगी कुर्ला पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोत, पालिका अधिकारी नितीन देशमुख, सागर पाटील, सुनील पाटील, अजय शुक्ला, कमलाकर बने, विजय मांढरे, शशिकांत आंब्रे, संदीप हुटगी, किरण माने, चेतन कोरगांवकर, अतुल चव्हाण, गणेश चिकने, रविंद्र बनसोडे, दिपू सिंह, संजय देवरुखकर, आनंद मोरजकर, अमित कांबळे, संजय ठाकूर आदी उपस्थित होते.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List