चोरट्यांचे धाडस वाढले, एक-दोन नव्हे तर 13 पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात चोरी

चोरट्यांचे धाडस वाढले, एक-दोन नव्हे तर 13 पोलीस अधिकाऱ्यांच्या घरात चोरी

चोर आणि पोलीस यांच्यात नेहमी द्वंद सुरु असते. परंतु चोरटे कधी पोलिसांच्या घरात चोरी करण्याची हिंमत करत नाही. मुंबईतील या चोरट्यांनी मुंबई पोलिसांच्या घरातच डल्ला मारला. मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या माहीम येथे असणाऱ्या पोलीस कॉलनीतील तेरा पोलिसांच्या घरात चोरी केली. या चोरट्यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या घरातून रोकड आणि मौल्यवान वस्तू सोबत देवाच्या चांदीच्या मूर्तीची चोरी केली. यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनावरच मोहीम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा प्रसंग आला.

पोलिसांच्या बंद घरांना लक्ष

राज्यात गुन्हे वाढत चालले आहे. गुंडांच्या टोळ्याही वाढल्या आहेत. भुरटे चोरटे ठिकाठिकाणी चोऱ्या करत असतात. परंतु एखाद्या पोलीस कॉलनीत जाऊन हातसफाई करणारे चोरटे हिंदी चित्रपटातच दिसले. मात्र, आता मुंबई पोलिसांना या चोरट्यांनी नाकीनऊ आणले आहे. चोरट्यांनी रात्रपाळीवर असलेले पोलीस कर्मचारी, सुट्टीनिमित्त गावी गेलेल्या पोलिसांची घर तसेच निवृत्त पोलिसांच्या बंद घरांना लक्ष केले. या घरांमधील वस्तू चोरऱ्या. तसेच पोलीस कॉलनीच्या शेजारील वसाहतीतील प्ले ग्रुप, नर्सरी आणि वसाहतीच्या कार्यालयांमध्ये देखील चोरांनी चोरी केली. आता माहीम पोलीस त्या चोरांचा शोध घेत आहे.

सीसीटीव्ही फुटेजची तपासणी

माहीम पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले की, 16 ते 17 ऑगस्ट दरम्यान चोरट्यांनी 13 पोलीस अधिकाऱ्यांकडे चोरी केली. ज्या घरांमध्ये चोरी झाली, त्या घरातील अधिकारी घरात नव्हते. घर बंद असल्याची संधी साधून ही चोरी केली गेली. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. त्यातून चोरांचा शोध घेतला जाणार आहे.

चोरांनी पोलीस कर्मचाऱ्यांची घरे लक्ष केल्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे. पोलीस वसाहत सुरक्षित नसेल तर सर्वसामान्य व्यक्तींची घरे कशी सुरक्षित राहणार? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;