ठाकरे गटाचा थेट पोलीस महासंचालकांना 1500 रुपयांचा ‘लाडकी बहीण’चा चेक, नेमकं प्रकरण काय?

ठाकरे गटाचा थेट पोलीस महासंचालकांना 1500 रुपयांचा ‘लाडकी बहीण’चा चेक, नेमकं प्रकरण काय?

बदलापुरात दोन चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेमुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे बदलापुरात तीव्र पडसाद उमटले. नागरिकांनी रस्त्यावर येत आंदोलन केलं. बदलापूरच्या नागरिकांनी काल दिवसभर लोकल सेवा ठप्प केली. या आंदोलनात सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा मुद्दा उपस्थित करत निशाणा साधण्यात आला होता. लाडकी बहीण योजना नको पण महिला आणि मुलींना सुरक्षा द्या, असं काही आंदोलकांनी पोस्टरवर झळकवलं होतं. आंदोलकांचं हे कृत्य सरकारच्या जास्त जिव्हारी लागलं. हे आंदोलन राजकीय प्रेरित असल्याचा आरोप सरकारकडून केला जातोय. असं असताना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा प्रतिकात्मक चेक देण्याचा प्रयत्न केला. पण रश्मी शुक्ला यांनी तो चेक स्वीकारला नाही.

बदलापूर येथील अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेल्या लैंगिक अत्याचारामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात असुरक्षिततेची भावना समाजात आणि विशेषतः महिला वर्गात निर्माण झाली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी उरण, कोपरखैरणे या ठिकाणी अशाच घटना घडल्या. त्यामुळे राज्यात ‘लाडकी बहिणी योजनेपेक्षा सुरक्षित बहीण हवी’ या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या आणि युवासेना कार्यकारीणी सदस्या यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची भेट घेतली.

राज्याच्या महिला सुरक्षिततेसाठी लाडक्या बहिणीचा प्रतिकात्मक चेक पोलीस महासंचालक यांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देऊ केला. मात्र त्यांनी तो स्वीकारण्यास नकार दिला. बदलापूर घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि या घटनेत दिरंगाई करणाऱ्या पोलीस, शाळा व्यवस्थापनावर कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन पोलीस महासंचालक यांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले.

अंबादास दानवे काय म्हणाले?

पोलीस महासंचालकांच्या भेटीनंतर अंबादास दानवे यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “राज्यात होत असलेल्या अत्याचाराच्या घटना या सरकार उघड्या डोळ्याने बघत आहे. या घटना रोखण्यास पोलीस दल कुचकामी ठरलं आहे. तसेच या घटना रोखण्यास महायुतीचे सरकार देखील अपयशी ठरले आहे”, असा आरोप अंबादास दानवे यांनी केला. तसेच “या घटनेवरून राजकारण सुरू आहे, असं म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांना जनता उत्तर देण्यास सक्षम आहे”, अशी प्रतिक्रिया दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीकेवर व्यक्त दिली.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदार ऋतुजा लटके, उपनेत्या विशाखा राऊत, माजी महापौर व उपनेत्या किशोरी पेडणेकर, उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेत्या राजुल पटेल, उपनेत्या शीतल देवरुखकर – शेठ, रंजना नेवाळकर, प्रवक्त्या व उपनेत्या संजना घाडी, युवासेना कार्यकारिणी सदस्या ऍड. गुरशीन कौर सहानी, धनश्री कोलगे, अश्विनी पवार, राजोल पाटील, दिक्षा कारकर, धनश्री विचारे आदी उपस्थित होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;