Ladki Bahin Yojana : भ्रष्टाचाराच्या कुरणात लाडकी बहीण योजनेची पण भर; राज्यात 44 योजनांना लाचखोरीचे ग्रहण, इतके गुन्हे दाखल

Ladki Bahin Yojana : भ्रष्टाचाराच्या कुरणात लाडकी बहीण योजनेची पण भर; राज्यात 44 योजनांना लाचखोरीचे ग्रहण, इतके गुन्हे दाखल

राज्यात लाडकी बहीण योजनेने महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक दिव्य पार केल्यानंतर महिलांना या योजनेचा लाभ मिळाला. तर या ऑगस्ट महिन्यात नाव नोंदणी झालेल्या महिलांना पुढील महिन्यात तीन हप्ते देण्यात येणार असल्याचे सरकारने स्पष्ट केलेले आहे. ही योजना सुरु होताच तिला भ्रष्टाचाराचे ग्रहण पण लागले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याविषयीची आकडेवारी समोर आणली आहे. राज्यात एकूण 44 योजनांना लाचेची कीड लागली आहे. लाचखोरांनी अनेक योजना पोखरल्या आहेत. लाडक्या बहीण योजनेत लाच मागितल्याप्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

सर्वसामान्यांच्या योजनांवर डल्ला

सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी सुरू असलेल्या योजनांवर लाचखोरांचा डोळा असतो. सरकारी कार्यालयातील अधिकारी या योजनेसाठी लाच घेतात. फाईलवर वजन ठेवल्यासाठी ती पुढेच सरकत नसल्याचे सर्वसामान्यांचा अनुभव आहे. गेल्या 8 महिन्यात
राज्यातील 44 विविध कल्याणकारी योजनांमध्ये 48 लाचखोरीचे गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. लाचलचुपत प्रतिबंधक विभागाने आकडेवारी सादर केली आहे.

आर्थिक पिळवणूक

विविध योजना या सरकारी बाबू आणि त्यांच्या चेल्याचपट्यांसाठी कुरणच असतात. विविध विभाग कल्याणाकारी योजना राबतात. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदाराचा अर्ज आला की, विविध नियमांकडे बोट दाखवत लाभार्थ्यांना जेरीस आणण्यात येते. त्याची कागदपत्रे योग्य असली तरी सरकारी अधिकारी उद्या या, परवा या, साहेब नाहीत, अशी कारणं देऊन वेळ मारुन नेतात. त्यामुळे अखेरीस जनतेला लक्ष्मी दर्शनाचा पर्याय उरतो. फाईलमध्ये, टेबलाखालून लाच दिली की झटदिशी काम होते. या योजना एकप्रकारे अर्थसहाय्य करत असतानाच आर्थिक पिळवणूकीचे अड्डेच झाल्या आहेत. ज्यांना लाच देण्याची इच्छा नसते, ते या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतात. लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात तक्रार दाखल करतात. 2024 या वर्षात जानेवारी ते या ऑगस्टपर्यंत एकूण 48 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अशी आहे आकडेवारी : Ladki bahin Yojana

लाडकी बहीण योजनेला भ्रष्टाचाराची कीड

लाडकी बहीण योजना नुकतीच सुरु झाली आहे. बहि‍णींना या योजनेसाठी कागदपत्र गोळा करण्यात, बँक खाते उघडण्यात, लिंक करण्यातच वेळ गेला. पण इतक्या कमी कालावधीतही या योजनेला भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे दिसून आले. या योजनेतंर्गत आतापर्यंत १ कोटी ३ लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत. या योजनेत लाच स्वीकारल्याप्रकरणात 4 गुन्हे दाखल झाले आहेत. तक्रार केली म्हणून हे गुन्हे दाखल झाले आहेत. तर तक्रार न केलली किती प्रकरणं असतील?

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;