आजच्या आज दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश; पोलिसांच्या भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे

आजच्या आज दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा, मुंबई हायकोर्टाचे आदेश; पोलिसांच्या भूमिकेवर कडक शब्दात ताशेरे

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने स्यूमोटो कारवाई केली आहे. कोर्टाने स्वत: या प्रकरणाची दखल घेऊन सुनावणी घेतली आहे. या सुनावणीवेळी कोर्टाने शाळा प्रशासन आणि पोलिसांना कडक शब्दात खडेबोल सुनावले आहेत. एकाच मुलीचं स्टेटमेंट घेतलं. दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट का घेतल नाही? आजच्या आज दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा, असे आदेशच मुंबई हायकोर्टाचे न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी पोलिसांना दिले आहेत. तसेच ज्या मुलीचे स्टेटमेंट नोंदवले गेले, तिचे हे स्टेटमेंट रेकॉर्ड केलंय का? असा सवालही कोर्टाने यावेळी केला आहे.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. यावेळी महाधिवक्ता बिरेंद्र सराफ हे सरकारकडून बाजू मांडत आहेत. तर एसआयटीच्या प्रमुख आरती सिंग आणि सुधाकर पठारे हे अधिकारी सुद्धा कोर्टात उपस्थित आहेत. यावेळी महाधिवक्त्याची बाजू ऐकतानाच कोर्टाने पोलिसांना चांगलंच फटकारलं आहे. तसेच शाळा प्रशासनाच्या गलथान कारभारावरही आसूड ओढले आहेत.

बदलापूर पोलीस बेजबाबदार कसे वागू शकतात?

या गुन्ह्यात एका मुलीचं स्टेटमेंट घेण्यात आलं. मग दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट का घेतलं नाही? बदलापूर पोलिसांनी योग्य काम केलं नाही म्हणून त्यांना निलंबित केलं असं म्हणणं योग्य नाही. ज्या मुलीचं स्टेटमेंट घेतलं ते रेकॉर्ड केलं आहे का? असा सवाल करतानाच बदलापूर प्रकरणात पोलीस असे बेजबाबदार कसे वागू शकतात? पोलिसांना सुरक्षतेच्या संदर्भात काही पाऊल उचलायचे आहेत की नाही?, असा सवाल न्यायाधीश पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

इतक्या उशिराने कारवाई का?

आम्ही कारवाई केली आहे, असं तुम्ही सांगत आहात. पण इतक्या उशिराने कारवाई करून काय उपयोग? असा सवाल करतानाच या प्रकरणात शाळा संचालकांनीही काहीच लक्ष दिलं नाही. दुसऱ्या मुलीचंही स्टेटमेंट रेकॉर्ड झालं पाहिजे होतं. तेही करण्यात आलं नाही. त्या दुसऱ्या मुलीचं स्टेटमेंट आजच्या आजच रेकॉर्ड करा, असे आदेशच न्यायाधीश चव्हाण यांनी दिले आहेत. काहीही न बघता इथे काहीही सांगू नका, असा शब्दात कोर्टाने महाधिवक्त्यांना फटकारलं.

काल रात्री स्टेटमेंट रेकॉर्ड

या प्रकरणातील एक मुलगी 3.8 वर्षाची आहे. दुसरी मुलगी चार वर्षाची आहे. असं असताना तुम्ही पीडितेच्या घरच्यांना सपोर्ट केला पाहिजे. आम्ही वर्तमानपत्रातील बेसिक बातम्यांवरून स्यूमोटो घेतला आहे, असं सांगतानाच या प्रकरणातील पोलीस तपासात कमतरता दिसून येत आहे. स्युमोटो टाकल्यानंतर काल रात्री तुम्ही मुलीच्या वडिलांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे. बदलापूर पोलिसांनी पालकांचे स्टेटमेंट पोलीस ठाण्यात का रेकॉर्ड केलं नाही? हे योग्य नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

स्टेटमेंड रेकॉर्ड केलंय

तुम्ही दुसऱ्या मुलीच्या वडिलांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे का? असा सवालही कोर्टाने केला. त्यावर एसआयटीकडून मुलीच्या वडिलांचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं आहे, असं महाधिवक्ते बिरेंद्र सराफ यांनी सांगितलं.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;