Badlapur Case : बदलापूर प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, आज तातडीची सुनावणी

Badlapur Case : बदलापूर प्रकरणाची मुंबई हायकोर्टाकडून दखल, आज तातडीची सुनावणी

दोन दिवसांपूर्वी बदलापुरात मोठ जन आंदोलन झालं. बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली होती. बदलापुरच्या शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाले. या घटनेविरोधात बदलापूरकरांनी मंगळवारी आक्रोश व्यक्त केला. बदलापुरात शाळा परिसरात आणि रेल्वे ट्रॅकवर रेल रोको आंदोलन झालं. आठ ते दहा तास हे आंदोलन सुरु होतं. रेल्वे रुळावर बसलेल्या आंदोलकांना हटवण्यासाठी पोलीस पोहोचले, त्यावेळी पोलिसांवर दगडफेक झाली. बदलापुरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा लागलेला. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, यासाठी काल बदलापुरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

आता बदलापूर प्रकरणाची मुंबई हाय कोर्टाने दखल घेतली आहे. याप्रकरणी कोर्टाने सुमोटो याचिका दाखल करुन घेतली आहे. आज सकाळी या प्रकरणाची तातडीची सुनावणी होणार आहे. बदलापूरमध्ये घडलेल्या प्रकरणाची हाय कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशीची मागणी केली आहे. न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे याप्रकरणी आज सुनावणी होणार आहे.

घटनेचे तीव्र राजकीय पडसाद

बदलापुरात घडलेल्या या घटनेचे तीव्र राजकीय पडसाद उमटले आहेत. सरकारने सुद्धा पुन्हा अशा घटना घडू नयेत, यासाठी पावल उचलली आहेत. विरोधी पक्ष सरकारवर टीका करतायत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रामगिरीं महाराजांना भेटायला वेळ आहे. पण पीडित मुलीच्या घरी जायला त्यांना वेळ नाही अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. कायदा-सुव्यवस्था बिघडवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबाबदार आहेत, असही त्या म्हणाल्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;