‘लाडकी बहीण योजने’मुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर? राज्यात लागणार राष्ट्रपती राजवट

‘लाडकी बहीण योजने’मुळे विधानसभा निवडणूक लांबणीवर? राज्यात लागणार राष्ट्रपती राजवट

केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणूक कार्यक्रम काही दिवसांपूर्वी जाहीर केला. पाच वर्षांपूर्वी हरियाणा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका सोबत झाल्या होत्या. परंतु यंदा सुरक्षा दल, महाराष्ट्रातील पाऊस अन् सणामुळे निवडणुका दिवाळीनंतर घेणार असल्याचे निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी म्हटले होते. या निवडणुका दिवाळीनंतर नाही तर डिसेंबर महिन्यात होणार असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ या दैनिकाने दिले आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लावून डिसेंबरमध्ये निवडणुका होणार आहे. लाडकी बहीण योजनेमुळे निवडणुका टाळल्या जात आहे.

डिसेंबर महिन्यात निवडणुका

मध्य प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरु झाली. त्या योजनेत पात्र महिलांना १५०० रुपये जुलै महिन्यापासून देण्यात येत आहे. योजनेचे एकत्रित दोन हप्ते काही दिवसांपूर्वीच महिलांच्या खात्यात जमा झाले. विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त महिला उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना दिला जाणार आहे. तसेच योजनेचे आणखी दोन-तीन हप्ते जमा झाल्यावर वातावरणनिर्मिती होणार आहे. योजनेसाठी अनेक महिलांनी अर्ज केले आहेत. परंतु काहींच्या अर्जात त्रुटी आढळल्या. त्या त्रुटी दूर करुन त्यांच्यापर्यंत लाभ देण्याचे काम करावे लागणार आहे. या प्रक्रियेस लागणारा वेळ लक्षात घेऊन डिसेंबर महिन्यात निवडणुका घेतल्या जाणार आहेत.

विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभेची मुदत संपल्यानंतर सहा महिन्यांत निवडणुका घेता येत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले होते. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवटीचे संकेतच त्यांनी दिले होते. राज्याच्या विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागणार आहे. राष्ट्रपती राजवट लावून काही आठवड्यात मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया करण्यात येईल, त्यात काही गैर नसल्याचे राजीव कुमार यांनी म्हटले होते.

महायुतीत योजनेच्या श्रेयासाठी लढाई

रक्षाबंधनानिमित्त लाडकी बहीण योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे. राज्यातील शहरा-शहरांत बॅनरबाजी करुन श्रेय घेतले जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे वेगवेगळे कार्यक्रम ठेवले गेले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;