महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100 महिला पाहायला मिळतील’; देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 100 महिला पाहायला मिळतील’; देवेंद्र फडणवीस यांचे मोठे विधान

काही लोकं लाडकी बहिणी योजना बंद होईल असं सांगत आहे. ही योजना बंद करण्यासाठी कोर्टातही गेले. सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका, हे भाऊ कालही काही देत नव्हते आणि आजही काही देत नाहीत. तुमच्या आर्शीवादाने आपल्या सरकारने 31 मार्चपर्यंतचे पैसे बजेटमध्ये ठेवले आहेत. सरकार पुन्हा येणार आणि पुन्हा एका पैशाचे पैसे ठेवणार. बजेटमध्ये नियमाने एकाच वर्षाचे पैसे ठेवता येतात, जर पाच वर्षांचे ठेवता आले असते तर आता ठेवून दिले असते. पण तुम्ही काळजी करू नका जोपर्यंत महायुतीचे सरकार आहे तोपर्यंत ही योजना कोणी बंद करू शकणार नाहीत, असा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी सर्व महिलांना दिला.

विधानसभेला 100 महिला पाहायला मिळतील- देवेंद्र फडणवीस

महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. मोदीजींनी सांगितलंय 2027 नंतर जेवढ्या निवडणुका होणार आहेत. विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिला प्रतिनिधी निवडून जाणार आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेत 100 महिला पाहायला मिळतील तर लोकसभेमध्ये दुप्पट महिला पाहायला मिळतील. मोदीजांनी देश चालवायचीच जबाबदारी महिलांकडे दिल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मला कोणी देवेंद्रजी म्हणतं, देवेन भाऊ म्हणतं, देवेन भाऊ म्हणत पण मला माझ्या बहिणा मला जेव्हा ‘देवा भाऊ’ बोलतात ते सर्वात जास्त आवडतं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं, विकसित भारत घडवायचा असेल तर आमच्या मातृशक्तीला, बहिणींना देशाच्या मुख्यधारेमध्ये आणल्याशिवाय भारत विकसित होणार नाही. मोदींनी विकसित भारताकरता विकसित महिला, विकसित मातृशक्ती अशा प्रकारचे महिला केंद्रित धोरण सुरू केल्याचं फडणवीसांनी सांगितलं.

महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये लाडकी मुलगी आणि लाडका मुलगा या दोन योजना चालतात. मुख्यमंत्री झाला तर माझा मुलगा आणि पंतप्रधानमंत्री झाला तर माझी मुलगी आणि मुख्यमंत्री झाली तर माझी मुलगी अशा दोनच योजना आहेत. आमच्याकडे बारा कोटी जनतेतील महिला आमच्या भगिणी आहेत. ही राखी असं कवच आहे जे मला कोणी काही करू शकणार नाही. आता हे कवच घेऊन मैदानात जातो आणि तुमच्यासाठी संघर्ष करून वेगवेगळ्या योजना घेऊन येतो, असं म्हणत फडणवीसांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;