महिला प्रवाशांसाठी एसटीची ‘जागा दाखवा’ मोहीम..!

महिला प्रवाशांसाठी एसटीची ‘जागा दाखवा’ मोहीम..!

राज्य सरकारने महिलांसाठी एसटीच्या बसमध्ये तिकीट दरामध्ये 50% सवलत दिली आहे. सध्या एसटीमध्ये महिला सन्मान योजना अंतर्गत लाखो महिला दररोज एसटीतून अर्ध्या तिकीट दरात प्रवास करीत आहेत. परंतु केवळ महिलांना तिकीट दरात सवलत देऊन चालणार नाही, तर योजनेच्या नावाप्रमाणे त्यांचा ‘सन्मान’ देखील केला पाहिजे! या हेतूने अक्षरा केंद्र या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एसटीने ‘जागा दाखवा’ हा प्रबोधनात्मक संदेश सर्व प्रवाशांपर्यंत पोहोचवण्याचा आणि त्यातून जनजागृती करण्याचा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार प्रत्येक बसस्थानकावर, समाजमाध्यमाच्याद्वारे एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसटीच्या कर्मचाऱ्यांना विविध चित्रफिती द्वारे महिलांचा प्रवासादरम्यान सन्मान करावा असा प्रभोधनात्मक संदेश दिला जाणार आहे.

बऱ्याचदा गर्दीचा गैरफायदा घेऊन सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः रेल्वे, लोकलचा प्रवास, एसटीचा प्रवास अशा ठिकाणी महिलांची छेडछाड केली जाते. त्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. या विरोधात आवाज उठवणे अत्यंत आवश्यक आहे. किंबहुना महिलांनी अशा प्रकारच्या गैरप्रकारांना वेळीच आळा घालण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे! धाडस दाखवलं पाहिजे! त्याबरोबरच अशा महिलांना सहकारी प्रवाशांनी देखील सहकार्य केलं पाहिजे! असा संदेश देणाऱ्या चित्रफिती आजपासून प्रत्येक बसस्थानकावर दाखवल्या जाणार आहेत.

योजनांमुळे एसटीचे उत्पन्नात वाढ झाली

एसटी महामंडळाला कोरोना काळात मोठे आर्थिक नुकसान झाले होते. त्यातच संप लांबल्याने देखील हंगाम वाया गेल्या एसटीची अवस्था अधिकच वाईट झाली होती. परंतू सरकारने आधी ज्येष्ठ नागरिकांसाठी अमृत योजना आणल्याने 75 वर्षांवरील नागरिकांना मोफत सवलतीचा फायदा झाला. त्यानंतर महिलांना अर्ध्या तिकीटात प्रवास योजनेमुळे एसटीपासून दूर गेलेले प्रवासी पुन्हा एसटीतून प्रवास करु लागले. सध्या दररोज एसटीने 50 लाख प्रवासी प्रवास करतात. तसेच  सवलतीची भरपाई सरकार निधी देऊन करीत असल्याने एसटीचे उत्पन्न वाढले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;