Raj Thackeray : ‘निवडणुका येतील-जातील, पण…’, म्हणून हा नेता सकाळीच राज ठाकरेंच्या भेटीला

Raj Thackeray : ‘निवडणुका येतील-जातील, पण…’, म्हणून हा नेता सकाळीच राज ठाकरेंच्या भेटीला

विधान परिषदेचे माजी आमदार कपिल पाटील यांनी आज सकाळी शिवतीर्थवर जाऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.  “महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती गेल्या काही दिवसात बिघडलेली दिसते. महाराष्ट्रातील सोशल फॅब्रिक तुटता कामा नये. महाराष्ट्राचा एकोपा, सलोखा कायम राहिला पाहिजे. यासाठी काम करण्याची आवश्यकता आहे. हा सलोखा साधण्याची ज्यांची ताकद आहे, अशी थोडी लोकं महाराष्ट्रात आहेत, राज ठाकरे त्यापैकी एक आहेत, म्हणून मी राज ठाकरेंना भेटायला आलो” असं कपिल पाटील म्हणाले. ते विधान परिषदेचे माजी आमदार आहेत.

“अनेक नेत्यांना मी भेटणार आहे. राजकारण बाजूला राहू दे, निवडणुका येतील-जातील. राज्यात, समाजा-समाजात वितुष्ट येता कामा नये. अकारण लोक भडकवत आहेत. वातावरण बिघडू नये, यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. म्हणून मी राज ठाकरे यांना भेटायला आलो. त्यांनी पुढाकार घ्यावा, अन्य नेत्यांना सुद्धा मी भेटणार आहे. महाराष्ट्राचा वारसा हा फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आहे. तो एकोपा, सलोखा कायम राहिला पाहिजे” असं कपिल पाटील म्हणाले.

‘राजकारण माझ्यासाठी दुय्यम’

“मी नेहमीच सामाजिक प्रश्नांवर काम करत आलोय. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. राजकारण माझ्यासाठी दुय्यम आहे. सामाजिक प्रश्नांसाठी वंचितांच्या मुद्दावर मी कायम सर्व नेत्यांना भेटत असतो, बोलत असतो समाजातील घटकांशी संवाद साधत असतो” असं कपिल पाटील म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;