Uddhav Thackeray : ‘जो अनुभव भाजपच्या युतीत घेतला, त्याची पुनरावृत्ती नको’; उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मित्रांना काय दिला सल्ला

Uddhav Thackeray : ‘जो अनुभव भाजपच्या युतीत घेतला, त्याची पुनरावृत्ती नको’; उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मित्रांना काय दिला सल्ला

मुंबईतील महाविकास आघाडीच्या निर्धार मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी महायुतीवर आणि केंद्रावर जोरदार प्रहार केला. त्यांनी राजकारणातील विविध विषयाला हात घातला. लोकसभा निवडणुकीत प्रचार करायला वेळ कमी मिळाला असला तरी विधानसभेसाठी दारुगोळा जमा केल्याचे त्यांनी संकेत दिले. त्याचवेळी ‘जो अनुभव भाजपच्या युतीत घेतला, त्याची पुनरावृत्ती नको’; अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मित्रांना असा सल्ला दिला.

आता लढाई महाराष्ट्र धर्म वाचवण्याची

आता महाराष्ट्र धर्म वाचवण्याची, महाराष्ट्राचा स्वाभिमान वाचवण्याची लढाई आहे. तू राहील नाही तर मी राहील या जिद्दीने निवडणूक लढायला पाहिजे. पण हे आपल्यात व्हायला नको. त्यांच्याविरोधात आपल्याला लढायचं आहे, जे महाराष्ट्र लुटायला आले आहेत. आपली आघाडी आधीपासूनच आहे. सरकारला आता जाग आली आहे. काही केलं पाहिजे असं त्यांना वाटतं. डुबक्या मारून बघत आहेत, पवित्र होता येईल का. रक्षाबंधनात स्वत:चे फोटो छापत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

तुम्ही चेहरा जाहीर करा, माझा पाठिंबा

पुढच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. आम्ही आहोतच. मी पण महाराष्ट्राचं हित जपू,. उमेदवारी मिळाली नाही तरी चालेल. पण यांना झोपवू याची शपथ घ्या. आपल्यात काड्या घालणारे लोक आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होणार. आता शरद पवार आणि पृथ्वीराजजी तुम्ही जाहीर करा. मी पाठिंबा देईल. मी माझ्यासाठी लढत नाही. मी मुख्यमंत्रीपद सोडलं ते महाराष्ट्रासाठी, असे ते म्हणाले.

आता पुन्हा तो अनुभव नको

महाराष्ट्र झुकवण्याची कोणाची हिंमत होणार नाही. जो महाराष्ट्राला झुकवण्याचं काम करतो त्याला गाडून टाकतो. आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करा. मी पाठिंबा देतो. जो अनुभव भाजपच्या युतीत घेतला. त्याची पुनरावृत्ती नको. २० आणि २५ वर्ष आमची युती होती. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री हे धोरण होतं. त्यावेळी एकमेकांच्या पायावर धोंडे पाडल्या जायचे. पाडापाडीचं राजकारण व्हायचं. त्यात महायुतीला काही नाही. त्यामुळे आधी ठरवा. चला पुढे. मला काही हरकत नाही. पण या धोरणाने जाऊ नका, असा सल्ला त्यांनी महाविकास आघाडीतील मित्रांना दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;