बहिणींचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही… सुप्रिया सुळे यांचा अजितदादांना टोला विधानाने अनेकांच्या काळजात चर्र..

बहिणींचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही… सुप्रिया सुळे यांचा अजितदादांना टोला विधानाने अनेकांच्या काळजात चर्र..

‘लोकसभेपर्यंत कोणालाच त्यांच्या बहीणी आठवल्या नाहीत, पण निकालानंतर त्यांना बहीण आठवायला लागली. दुर्देव एका गोष्टीचं म्हणजे बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही ‘ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना टोला लगावला. महायुतीत सामील असलेल्या अजित पवार यांनी जाहीर केलेली ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ वरून तसेच लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करणं ही चूक होती, हे त्यांनी मान्य केलं , या दोन्ही मुद्यांवरून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.  महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. सुप्रिया सुळे यांनी हे उद्गार काढताच अनेकांच्या काळजात चर्र झालं

यावेळी त्यांनी लोकसभेतील विजयासाठी मदत करणाऱ्या मविआतील शिवसेना ( उद्धव ठाकरे) आणि काँग्रेस यांचेही मन:पूर्वक आभार मानले. आम्हाला जिंकून आणण्यासाठी तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केलीत, तसेच कठोर परिश्रम आम्ही येत्या विधानसभेत करू आणि मविआच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणू असे आश्वासनही सुप्रिया सुळे यांनी यावेळी दिले.

त्यांना बहिणीचं नात कळलंच नाही

आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ तसेच लाडका भाऊ योजनाही जाहीर केली. मात्र विरोधकांनी त्यावर कडाडून हल्ला चढवत सरकारला धारेवर धरलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी टोला लगावत अजित पवार यांना सुनावलं. ‘ लोकसभेनंतर कुणालाच बहीण आठवली नाही. रिझल्ट नंतर त्यांना बहीण आठवायला लागल्या. दुर्देव एका गोष्टीचं बहिणीचं नातं आमच्या भावांना कळलंच नाही. त्यांनी प्रेम आणि व्यवसायात गल्लत केली. प्रेमात व्यवसाय आणि पैसे नसतात. आणि व्यवसायात प्रेम नसतं. कारण व्यवसायात प्रेम केलं तर नाती अंगावर येतील. आणि प्रेमात पैसे आले त्याला नातं म्हणत नाही.’ अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

आमचं तुमच्यावर लक्ष आहे.

महाराष्ट्र सरकारचं दुर्दैव आहे की त्यांना व्यवसाय आणि प्रेमाचं नातं कळलं नाही. ते म्हणतात एक बहीण गेली तर दुसरी बहीण आणू. पण १५०० रुपयाला हे नातं विकाऊ नाही हो. आमच्या नात्याचा अपमान.. मुळातच बहीण भावाचं प्रेम असतं त्याला किंमत लावण्याचं पाप या राज्य सरकारने केलं.

आमचे दोन वीर बंधू आहेत. एक म्हणाले, आमची रक्षणकर्ती बहीण कुठे मतदान करते. कधी तरी पोटातलं ओठात येतं. काळजी करू नका आमचं लक्ष आहे. तुमच्यावर. ऑक्टोबरनंतर तुम्हाला १० हजार दिले तसे परत घेण्याची ताकद आमच्यात आहे, असं एक म्हणाला. हे बहि‍णींची लिस्ट तयार करणार आहे. यांचं कोणतंही नातं प्रेमाचं नाही. ते मताचं आहे. कोणत्या बुथवर किती मते पडली त्यावर ते पैसे देणार आहे. तुम्ही सर्व बहि‍णींचे नाही एकाच बहि‍णींचे पैसे घेऊन दाखवाच, असा इशाराही सुप्रिया सुळे यांनी दिला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;