Vinayak Raut : नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाचे समन्स; विनायक राऊत यांनी खासदारकी रद्द करण्यासाठी दाखल केली आहे याचिका

Vinayak Raut : नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाचे समन्स; विनायक राऊत यांनी खासदारकी रद्द करण्यासाठी दाखल केली आहे याचिका

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात राजकारणात पुन्हा शिमगा सुरु झाला आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांनी भष्ट्राचार करुन विजय मिळवल्याचा आरोप करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेवर ठाकरे गटाने मोठा आक्षेप नोंदवला आहे. उद्धव ठाकरे सेनेचे विनायक राऊत यांनी सदर याचिका दाखल केली होती. याप्रकरणात हायकोर्टाने खासदार नारायण राणे यांना समन्स बजावले आहे.

निवडणुकीत मते घेतली विकत

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी या निवडणुकीत मते विकत घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. राणे यांनी मतदारांना धमकावले आणि विजय मिळवल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करत त्यांनी राणे यांची खासदारकी रद्द करण्याची विनंती केली आहे. याचिकेत नारायण राणे, केंद्रीय निवडणूक आयोग, राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाला प्रतिवादी करण्यात आले आहे.

याचिकेतील आरोप काय

नारायण राणे यांनी मते विकत घेतली. मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचे याचिकेत म्हटले आहे.नारायण राणे, त्यांचे चिरंजीव नितेश राणे तसेच भाजप कार्यकर्त्यांनी निवडणूक काळात अनेक गैरप्रकार केले. त्याबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र कारवाई करण्याची तसदी पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी घेतली नाही.आचारसंहिता भंगाच्या प्रकारांकडे जाणूनबुजून डोळेझाक केली आणि निष्पक्ष व पारदर्शक निवडणूक प्रक्रियेच्या तत्त्वाला हरताळ फासला असा आरोप याचिकेत करण्यात आला आहे. प्रचारात मतदारांना धमकी तसेच पैसे वाटप करण्याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. त्याआधारे चौकशी करावी. त्यांची खासदारकी रद्द करावी. 7 मे रोजी झालेली लोकसभा निवडणूक आणि 4 जून रोजीचा निकाल अवैध आहे, असे घोषीत करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. राणे यांनी मिळवलेला विजय रद्द करा तसेच निवडणूक काळातील भ्रष्टाचाराच्या सखोल चौकशीसाठी स्वतंत्र समिती नेमण्याचे आदेश द्यावेत अशी विनंती याचिकेतून करण्यात आली आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात पुन्हा निवडणूक घेण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;