भाजपच्या आमदारांनी मंदिरांच्या जमिनी लाटल्या…जयंत पाटील यांचा मोठा आरोप

भाजपच्या आमदारांनी मंदिरांच्या जमिनी लाटल्या…जयंत पाटील यांचा मोठा आरोप

हिंदू देवस्थानांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जमिनी दिल्या गेल्या आहेत. परंतु भाजपच्या एक दोन आमदारांनी मंदिराच्या जमिनी लाटल्या आहेत. या जमिनी घेताना नजराणा भरायचा असतो. परंतु त्यांनी ५० टक्के नजराणा भरला. हा विषय मी दोन वेळा विधानसभेत काढला. आता परवा नजराण्याची रक्कम कमी केली आहे. महाराष्ट्रात हिंदू देवस्थानाच्या जमिनी विकण्याचे पाप भाजपकडे जात आहे. या जमिनीसंदर्भात कोर्टात तक्रारी गेल्या आहेत. सरकारकडून हिंदूच्या मंदिरांच्या जमिनी लाटल्या जात आहेत. भारतीय जनता पक्षाचे लोकच मंदिराच्या जमिनी लाटत आहेत. मंदिराच्या जमिनी लाटण्याचे काम भाजपने केले आहे. देवस्थानच्या जमिनी बिल्डराच्या ताब्यात दिल्या जात आहेत. महाराष्ट्र सरकारचा लुटालुटीचा कारभार सुरु आहे, असा घाणाघाती हल्ला भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केला.

४०० पारचा नारा केला, पण…

महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात जयंत पाटील बोलत होते. महाराष्ट्र सरकार हे घाबरलेले सरकार आहे. त्यांना निवडणुकीची भीती आहे. ते प्रत्येक निवडणुकीला घाबरत आहे. मागील दोन वर्षांत त्यांनी जसे काम केले आहे, त्यामुळे ते धास्तावले आहेत. निवडणूक ऑक्टोंबरमध्ये घेण्याचे धाडस ते करणार नाहीत. ते दिवाळी झाल्यानंतरच निवडणुका घेणार आहेत. लोकसभेत ४०० पारचा नारा केला, पण ते २४० जागांवर थांबले. त्यांना बिहार आणि आंध्र प्रदेशाचा टेकू मिळाले. परंतु ते पलटी मारु लोक आहेत. हे सरकार कधी खाली येईल, त्याचे नेम नाही. फक्त आता सहा वर्ष की एक वर्ष हे बाकी आहे.

विधानसभा निवडणुका आता येणार आहे. आपण एकत्र राहिले तर हे सरकार आपलेच असणार आहे. साताऱ्यात पिपाणीला ३७ हजार मते गेली, त्यामुळे आमची जागा गेली. मुंबईतील आमची जागा चोरली. विधानसभेचे काम आपण सुरु केले आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची आणि महत्वाची आहे. उद्धव ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी एकत्र राहून काम करणे गरजेचे आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;