विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण? संजय राऊत यांनी स्पष्टपणे नावाच सांगितले

विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण? संजय राऊत यांनी स्पष्टपणे नावाच सांगितले

राज्यात ऑक्टोंबर, नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावर चर्चा सुरु झाल्या आहेत. शिवसेना उबाठा पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी नुकताच नवी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्या भेटीत मुख्यमंत्रीपदावर चर्चा झाल्याच्या बातम्या आल्या. काँग्रेस निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यास तयार नसल्याचे वृत्त त्या दौऱ्यादरम्यान आले. परंतु आता शिवसेना उबाठा पक्षाचे नेते संजय राऊत यांनी पुढील मुख्यमंत्री कोण असणार? हे स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर त्या सरकारकडून काय करण्यात येणार? त्याचीही माहिती दिली. आता निवडणुकीनंतर ठाकरे 2 सरकार येणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले. म्हणजेच महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असणार असल्याचे संजय राऊत यांनी गुरुवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.

संजय राऊत यांनी 370 कलम रद्द करण्याचा फायदा केवळ भाजपला झाल्याची टीका केली. देशाला कलम 370 करण्याचा काहीच फायदा झाला नाही. काश्मिरात 15 ऑगस्टच्या पूर्वसंध्येला जवान शहीद होत आहेत. अतिरेक्यांचे हल्ले रोखण्यात मोदी सरकारला यश आले नाही. नरेंद्र मोदी यांच्याकडे बहुमत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले.

धारावी प्रकल्पाची एक विट रचू देणार नाही

मुंबई शहरातील आणखी एक भूखंड अदानी यांना दिला आहे. कांजूरमार्ग येथील भूखंड दिला जात आहे. एकूण 22 बहुमूल्य भूखंड दिले महायुती सरकारकडून अदानी यांना दिले जात आहेत. हे सरकार तीन गँगचे सरकार आहे. पूर्वी लँड माफिया गुंडगिरी करत होते. आता सरकारचे लाडके उद्योगपती यांना भूखंड दिले जात आहे. शिवसेना या प्रकल्पाची एकही विट रुचू देणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी केला. मंत्रिमंडळ बैठकीत जे वाद होत आहेत. गँगवार पेटले आहे. हे सरकारमधील शिंदे आणि फडणवीस गँगमधील वाद आहेत.

आताची लाडकी बहीण योजना बंद करणार…

लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ लागले आहे. सरकारकडून दिलेले पैसे कोणाच्या खिशातील पैसे नाही. त्यामुळे लोकांनी त्या पैशांचा लाभ घ्यावा. परंतु मतांसाठी निर्माण केलेली ही योजना बंद होणार आहे. काही दिवसांत सरकारच्या या सर्व योजना बंद करण्यात येतील. महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर नव्या स्वरुपात या योजना अणणार आहे. ठाकरे 2 सरकार येणार आहे, असे संजय राऊत यानी म्हटले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;