अजितदादांच्या आमदाराच्या चिरंजीवाने ऑस्ट्रेलियातून येताच घेतली शरद पवार यांची भेट; भेटीचं कारण काय?

अजितदादांच्या आमदाराच्या चिरंजीवाने ऑस्ट्रेलियातून येताच घेतली शरद पवार यांची भेट; भेटीचं कारण काय?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हल्ली खूपच भावूक झाले आहेत. त्यांनी महायुतीत आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. अजितदादांनी राज्याचा अर्थसंकल्प मांडताना ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली. परंतू त्यानंतर सारे श्रेय नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेऊन गेले आहेत. आता अजित पवार यांनी आपण आपल्या पत्नीला आपल्या बहिणीच्या विरोधात लोकसभेत उभारायला नको होते अशी खंत बोलून दाखविली आहे.त्यातच आता अजितदादा यांच्या गटाचे आमदार शेखर निकम यांचा मुलगा अनिरुद्ध निकम यांनी ऑस्ट्रेलियातून येताच शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वरओक’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेत आशीर्वाद घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

अजितदादा यांच्या गटाचे आमदार शेखर निकम यांचे चिरंजीव अनिरुद्ध यांनी ऑस्ट्रेलिया येथून हॉर्टिकल्चरमध्ये पदव्युतर पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी ऑस्ट्रेलियातून मुंबईत येताच शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वरओक या निवासस्थानी भेट घेतली. विशेष म्हणजे जुलै 2022 रोजी ऑस्ट्रेलियाला शिकायला जाताना देखील त्यांनी सहकुटुंब शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते.

गोविंदराव निकम यांच्या आठवणींना उजाळा

दोन वर्षातील ऑस्ट्रेलियातील शैक्षणिक अनुभव आणि ऑस्ट्रेलिया कृषी विभागासोबत केलेल्या कामांची शरद पवार यांनी अनिरुद्ध निकम यांच्याकडून माहिती घेतली. तसेच भविष्यात काय करणार याचीही चर्चा करुन अनिरुद्ध यांना वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी खासदार गोविंदराव निकम यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. खासदार गोविंदराव निकम यांच्यासोबत खासदार असताना एकत्रित केलेल्या कामांची पवार यांनी चर्चा केली. खासदार गोविंदराव निकम यांचे कोकणासाठी असलेल्या योगदान याची आठवण करून  शिक्षण, सहकार, राजकारणात एकत्रित काम केलेल्याच्या आठवणी पवार साहेबांनी सांगितल्या. शरद पवार यांनी आमदार शेखर निकम यांची आपुलकीने चौकशी करून सर्व कुटुंबियांची आणि त्यांच्या संस्थेची कामे जाणून घेतली. या भेटीने राजकारणात नवीन चर्चा सुरु झाली आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;