पत्नीला बहिणीविरोधात लढवणे ही माझी…अजित पवारांच्या विधानाने एकच खळबळ, सुप्रिया सुळेंची पण आली रिॲक्शन
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी एक मोठे वक्तव्य केले. लोकसभा निवडणुकीसंदर्भातील त्यांच्या या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे. लोकसभा निवडणुकीत पवार कुटुंबातच यावेळी सामना रंगला होता. अजित पवार यांच्या पत्नी सुप्रिया पवार या लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार होत्या. तर त्यांची बहीण सुप्रिया सुळे यांनी महाविकास आघाडीकडून ही निवडणूक लढवली. त्यात सुप्रिया सुळे यांचा विजय झाला. आता या लढतीबाबत अजितदादांच्या एका वक्तव्याने मोठे वादळ उठले आहे.
ती माझी चूक..
माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांनी एक मोठी कबुली दिली आहे. लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळेंविरोधात पत्नी सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवणं ही मोठी चूक होती, अशी कबुली अजित दादांनी दिली. बहीण सुप्रियाविरोधात सुनेत्रा पवारांना उभं करायला नको होतं. आज माझं मन मला सांगतं. तसं व्हायला नको होतं. रक्षाबंधनाच्यावेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरुर जाणार, असे ते म्हणाले.
सविस्तर बातमी लवकरच…
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List