सलग सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी व्हा सज्ज, कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडणार !

सलग सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी व्हा सज्ज, कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडणार !

श्रावण महिन्यातील विविध सण आणि ऑगस्ट महिन्यात सलग आलेल्या सु्ट्ट्यांमुळे विविध ठिकाणी फिरायला जाण्याचा प्लान आखला जातो. अनेक जण कोकणातही जात असतात, त्यामुळे कोकणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. तसेच या कालावधीत धावणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या प्रतीक्षा यादीची मर्यादा संपल्याचे मेसेज प्रवाशांना येत आहेत. यामुळे सलग सुट्टीच्या वेळी कोकणात जाण्यासाठी मध्य आणि कोकण रेल्वेवरून विशेष रेल्वेगाडी सोडण्यात येणार आहे. 15 आणि 17 सप्टेंबर रोजी मुंबईहून कोकणात विशेष रेल्वेगाडी धावणार आहे.

तसेच स्वातंत्र्यदिन व रक्षाबंधननिमित्त सलग सुट्ट्यांच्या काळात मुंबई ते चिपळूण, रत्नागिरी, सावंतवाडीदरम्यान स्वतंत्र विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून केली होती. 15 ते 19 ऑगस्टपर्यंत सलग सुट्ट्या आल्याने, मुंबई ते सावंतवाडी दरम्यान धावणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांतील आरक्षणासाठी भलीमोठी प्रतीक्षा यादी आहे.त्यामुळे काही गाड्या सोडण्यात येणार आहेत.

असे असेल वेळापत्रक :

गाडी क्रमांक 01149 लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव ही गाडी 15 आणि 17 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रात्री 9 वाजता विशेष रेल्वेगाडी सुटेल व दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता रेल्वे मडगाव येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 01150 मडगाव ते लोकमान्य टिळक टर्मिनस 16 आणि 18 ऑगस्ट रोजी मडगाव येथून सकाळी 11 वाजता विशेष रेल्वेगाडी सुटेल आणि दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी रात्री 12.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल

या रेल्वेगाडीला ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि आणि करमळी येथे थांबा देण्यात येईल.

यात द्वितीय श्रेणी वातानुकूलित 2 डबे, तृतीय श्रेणी वातानुकूलित 6 डबे, शयनयान 8 डबे, सामान्य 3 डबे जनरेटर कार 1 व एसएलआर 1 अशी संरचना रेल्वेची असेल.

 

बाप्पाच्या स्वागतासाठी नोकरदार कोकणात; एसटीचे बुकिंग फुल

दरम्यान गणेशोत्सवासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यंदाही सज्ज झाले आहे. या वर्षीही ठाणे विभागाने नोकरदार कोकणात जाण्याचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी तब्बल दोन हजार 32 गाड्या तिकीट, ग्रुप आरक्षणासाठी ठेवल्या आहेत. यामध्ये ग्रुप आरक्षणावर विशेष भर दिला आहे.

आतापर्यंत तब्बल 922 बसचे बुकिंग फुल्ल झाले आहे. त्यात ग्रुप बुकिंगच्या 501 बसचा समावेश आहे. यातील बहुतेक ग्रुप बुकिंगच्या बस या राजकीय मंडळींनीच बुक केल्याचेही दिसते. 2 हजार ३२ बस सज्ज असल्या तरी प्रवाशांची संख्या वाढल्यास आणखी बस वाढविण्याचे नियोजनदेखील एसटीने आखले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;