आज सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या रुग्णांचे हाल होणार, निवासी डॉक्टरांनी उचललं मोठं पाऊल

आज सरकारी हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या रुग्णांचे हाल होणार, निवासी डॉक्टरांनी उचललं मोठं पाऊल

कोलकाता येथील आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये घडलेल्या घटनेने सगळा देश हादरला आहे. येथे काम करणाऱ्या एका ज्यूनियर महिला डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. आरोपीने अत्यंत क्रूरतेने, निर्घुणतेने खून केला. त्यामुळे वैद्यकीय विश्वात संताप, रागाची भावना आहे. या घटनेने डॉक्टरांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पश्चिम बंगालमध्ये डॉक्टरांकडून आंदोलन सुरुच आहे. डॉक्टर रस्त्यावर उतरलेच आहेत. पण देशाच्या अन्य राज्यातही कोलकात्यात घडलेल्या या घटनेविरोधात डॉक्टरांकडून आंदोलन सुरु झालं आहे.

महाराष्ट्रातही कोलकात्याच्या घटनेचे पडसाद उमटले आहेत. कोलकत्ता येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निवासी डॉक्टरांनी आजपासून आंदोलन सुरु केलं आहे. अत्यावश्यक सेवा वगळता मुंबईतील सर्व निवासी डॉक्टरांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरु केलय. नायर रुग्णालय, जेजे रुग्णालय, के ई एम रुग्णालयातील डॉक्टर कोलकत्ता येथे घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आज निदर्शने करणार आहेत.

महाराष्ट्रातील डॉक्टरांची मागणी काय?

“9 तारखेला डॅाक्टर महिलेवर अत्यंत क्रूर पद्धतीने बलात्कार करण्यात आला. हा निंदनीय प्रकार आहे. देशभरात संप सुरू आहे. न्यायाची अपेक्षा आहे. सीबीआय चौकशी झाली पाहिजे. आरोपींना वाचवण्यासाठी प्रयत्न केला जातो आहे. याला आम्ही विरोध करतो. बलात्कार आणि हत्येचा प्रकरणाच्या तपासासाठी केंद्रीय एजन्सीची तात्काळ नियुक्ती करावी. तात्काळ ऑडिट करून सर्व वैद्यकीय संस्थांमध्ये सुरक्षा उपाय लागू करावी” अशी मागणी या डॉक्टरांनी केलेली आहे

किती डॉक्टर संपावर?

“आज सकाळपासून ससूनमधील निवासी डॉक्टर संपावर आहेत. काल मार्ड डॉक्टरांनी पत्र दिलं आहे. आम्ही संपावर जात आहोत. कोलकत्तामध्ये घटना घडायला नको होती ती घडली. रुग्ण सेवा विस्कळीत होऊ नये म्हणून आम्ही पर्यायी व्यवस्था केली आहे. सहाशे ते साडेसहाशे डॉक्टर संपावर जातं आहेत. निवासी डॉक्टरांचे आजपासून कामबंद आंदोलन करत आहेत, फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत” असं ससून रुग्णालयाचे डीन एकनाथ पवार यांनी सांगितलं.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;