Munawar Farooqui : ‘तुला पाकिस्तानात पाठवू’, कोंकणी माणसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मुनव्वर फारुकीला भाजपची धमकी, मग घडलं काय

Munawar Farooqui : ‘तुला पाकिस्तानात पाठवू’, कोंकणी माणसांना शिवीगाळ केल्याप्रकरणी मुनव्वर फारुकीला भाजपची धमकी, मग घडलं काय

Big Boss 18 चा विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन मुनावर फारुकी याने पुन्हा एक वाद ओढावून घेतला. मुनव्वर फारुकीने कोकणी माणसाविषयी अपशब्द वापरले. एका कार्यक्रमादरम्यान हा प्रकार घडला. त्यानंतर त्याच्यावर विविध स्तरातून टीका झाली. तर मनसेसह भाजपने पण त्याची कान उघडणी केली. भाजपने तर त्याला पाकिस्तानमध्ये पाठवण्याची धमकी दिली. मनसेने पण त्याचे थोबाड झोडण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे वातावरण चिघळले आहे. काय आहे हे प्रकरण, नेमकं घडलं तरी काय?

या शब्दामुळे अडकला वादात

स्टँडअप कॉमेडियन मुन्नावरने गेल्या आठवड्यात एक शो केला होता. त्यामध्ये त्याने कोकणी माणसांवर टीका केली होती. त्यांच्याविषयी अपशब्द वापरले. (हे कोकणी लोक *** बनवतात.) अशी अश्लाघ्य टीका त्याने केली होती. यानंतर वादाचे मोहळ उठले. अशा शब्दाचा वापर केल्याने कोकणी माणूस नाराज आणि संतप्त झाला.

शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते, आमदार आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराचे विश्वस्त सदा समाधान सरवणकर यांचा मुलगा समाधान सरवणकर यांनी तर मुनव्वरला मारहाण करणाऱ्याला एक लाखांचे बक्षीस जाहीर केले. पाकिस्तानप्रेमी मुनव्वरने कोकणी लोकांची माफी मागितली नाही तर जिथे दिसेल तिथे त्याला बदडणाऱ्यांना एक लाख रुपये देण्यात येतील असे सरवणकर यांनी जाहीर केले. तर मनसेने मुनव्वर जिथे दिसेल, तिथे फटकवण्याचे जाहीर केले. तर भाजपच्या नेत्यांनी पण त्याची कानउघडणी केली.

नितेश राणे यांचा संताप

तर भाजप नेते नितीश राणे यांनी मुनव्वरची चांगलीच कान उघडणी केली. तुझ्यासारखे हिरवे साप पाकिस्तानात पाठवायला जास्त वेळ लागणार नाही. तू कोकणातील जनतेला शिव्या दिल्या आहेस. माफी न मागितल्यास तुला पाकिस्तानला पाठवण्यास आम्हाला वेळ लागणार नाही, अशी धमकीच त्यांनी दिली.

मुनव्वर फारुकी याने मागितली माफी

सगळीकडून हल्लाबोल सुरू झाल्याने मुनव्वर फारुकी याने त्याने वापरलेल्या अपशब्दाबाबत माफी मागितली. काही काळापूर्वी एक शो आला होता. त्यामध्ये प्रेक्षकांची संवाद साधत होते. त्यावेळी कोकणाविषयी चर्चा झाली. माझ्या बोलण्यातून गैरसमज झाला. कोकणी समुदायाबद्दल मी काहीतरी चुकीचे बोललो असे काहींना वाटते. त्यांची मी चेष्टा केली असा गैरसमज झाला. कोणालाही दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. कोकणावर माझे खूप खूप प्रेम आहे आणि मी माफी मागतो, असे फारुकीने स्पष्ट केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;