वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट, आरोपी मिहिर शाहाचा ब्लड रिपोर्ट समोर

वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांनी दिली महत्त्वाची अपडेट, आरोपी मिहिर शाहाचा ब्लड रिपोर्ट समोर

Worli Hit And Run Case Update : गेल्या महिन्यात मुंबईतील वरळी परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वरळी हिट अँड रन केसमधील मुख्य आरोपी असलेल्या मिहीर शाहाची ब्लड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. मिहीर शाहाच्या वैद्यकीय तपासणीतील रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल सापडले नाही. त्यामुळे पोलिसांना मोठा झटका बसला आहे. वरळीतील हिट अँड रन प्रकरणी कारचालकाच्या धडकमुळे एका महिलेला जीव गमवावा लागला होता. तर तिचा पती गंभीर जखमी झाला होता.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील वरळी भागात 9 जुलै रोजी भरधाव बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यामुळे महिलेला प्राण गमवावे लागले होते. या कारने दुचाकीवर असलेल्या नाखवा दाम्पत्याला उडवले. त्यानंतर जखमी झालेल्या कावेरी नाखवा यांना गाडीने काही अंतरापर्यंत फरफटत नेले होते. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांचे पती जखमी झाले होते. वरळीत अपघात झालेली ती बीएमडब्ल्यू कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उपनेते असलेल्या राजेश शाह यांची होती. अपघातावेळी शाह यांचा मुलगा मिहिर शाह दारु पिऊन कार चालवत होता.

ही दुर्घटना घडल्यानंतर तीन दिवस मिहिर शाह फरार होता. मिहिर शाहने स्वत: चा आणि मित्राचा मोबाईल बंद ठेवला होता. तसेच तो पालघर आणि बोरिवलीच्या एका मित्राच्या फोनवरून अनेकांशी संवाद साधत होता. मिहिर शहा शहापूरच्या रिसॉर्टमधून विरारला आला. या दरम्यान सकाळी 15 मिनिटांसाठी मिहिरच्या मित्राने त्याचा बंद ठेवलेला मोबाईल 15 मिनिटांसाठी सुरू केला. हा फोन पोलिसांच्या सर्वेलन्सवर होता, त्याचं लोकेशन पोलिसांना मिळालं आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

रक्त तपासणीचा अहवाल समोर

वरळी हिट अँड रन प्रकरणी मुख्य आरोपी असलेला मिहिर शाहाला तीन दिवसांनी पोलिसांनी अटक केली. यानंतर त्याची रक्त तपासणी करण्यात आली. आता त्याच्या रक्त तपासणीचा अहवाल समोर आला आहे. मिहीर शाहाच्या रक्ताच्या नमुन्यात अल्कोहोल सापडलेले नाही. त्यामुळे त्याची ब्लड टेस्ट निगेटिव्ह आली आहे. रक्ताची तपासणी करण्यास उशीर झाल्यामुळे अल्कोहोल मिळाले नसल्याचा दावा पोलिसांकडून केला जात आहे. त्यामुळे पोलिसांना मोठा झटका बसला आहे. तसेच आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ओळख परेड पडली पार

वरळी हिट अँड रन प्रकरणी आरोपी मिहिरला कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलीस प्रयत्न करत होते. पण, आरोपीचा ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आता पोलिसांना झटका बसला आहे. तर दुसरीकडे या प्रकरणी साक्षीदार असलेल्या कावेरी नाखवा यांच्या पतीने मुख्य आरोपीने मिहिर शाहाला ओळखले आहे. नुकतंच आर्थर रोड कारागृहात त्याची ओळख परेड पार पडली. या परेडमध्ये मिहिर शाहाने कावेरी नाखवा यांना उडवल्याचे त्यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;