मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर तीन नेत्यांमध्ये मध्यरात्री खलबते, अडीच तासाच्या बैठकीत असे झाले निर्णय

मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर तीन नेत्यांमध्ये मध्यरात्री खलबते, अडीच तासाच्या बैठकीत असे झाले निर्णय

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उबाठाचे नेते उद्धव ठाकरे यांनी त्यासाठी दिल्ली दौरा केला. त्यात महाविकास आघाडीची रणनीती ठरवण्यात आला. त्यानंतर मुंबईत महायुतीने गुरुवारी मध्यरात्री बैठक घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत तिन्ही पक्षाची बैठक झाली. सुमारे अडीच तास तिन्ही प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत खलबते झाले. त्यात आगामी विधानसभा निवडणुकीचा रणनीती निश्चित करण्यात आली. तिन्ही पक्षाकडून सामूहिक सभा, दौरे आणि मेळावे घेण्यात येणार आहे. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग येत्या २० ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथून फुंकण्यात येणार आहे.

तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा

वर्षा बंगल्यावरील बैठक गुरुवारी रात्री ११ ते १.३० पर्यंत सुरु होती. या बैठकीत विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरल्याची माहिती मिळाली आहे. मेळावे, सभा आणि संवाद दौरे आयोजित करण्यात येणार आहे. राज्यातील प्रत्येक मतदार संघावर लक्ष ठेऊन रणनीती तयार केली जाणार आहे. येत्या २० तारखेपासून तिन्ही नेत्यांच्या जाहीर सभा होणार आहे.

७ विभागात सभा होणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवास्थानी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार रात्री ११ वाजता पोहचले. त्यानंतर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरु झाली. या बैठकीत ७ विभाग आणि २८८ विधानसभेत एकाच दिवशी विभागनिहाय संवाद दौरे, लाभार्थी यात्रा व सभा आयोजित करण्याबाबत निर्णय झाला. तसेच ७ विभागात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभा होणार आहेत. २० ऑगस्ट रोजी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोल्हापूर येथून जाहीर सभेने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुकंले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीत महायुतीला चांगलाच झटका बसला होता. या निवडणुकीत महायुतीला ४८ पैकी केवळ १७ जागांवर विजय मिळवता आला होता. महाविकास आघाडीने ३० जागा आणि महाविकास आघाडीतील बंडखोर अशा ३१ जागांवर वर्चस्व निर्माण केले होते. त्यामुळे आता महायुतीने अधिक जोराने काम सुरु केले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;