उद्धव ठाकरे यांची दिल्ली वारी यशस्वी, महाविकास आघाडीत ठाकरेंना मिळाले…विधानसभेचे सूत्रही ठरले

उद्धव ठाकरे यांची दिल्ली वारी यशस्वी, महाविकास आघाडीत ठाकरेंना मिळाले…विधानसभेचे सूत्रही ठरले

शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात बुधवारी त्यांना मोठे यश मिळाले. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतल्या. काँग्रेस सोबत झालेल्या बैठकीत येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. त्या मागणीला यश आल्याचे वृत्त आहे. महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीपूर्वी आपला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणार आहे. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहर उद्धव ठाकरे असणार आहे, असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

कोण किती जागेवर लढवणार

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बुधवारी बैठक झाली. या बैठकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र लढण्यावर सहमत झाले. त्यानुसार काँग्रेस पक्षाला सर्वाधिक जागा मिळणार आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकाच्या जागा शिवसेनेला मिळणार आहे. तीन नंबरवर शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार आहे. बुधवारी दिल्लीत झालेल्या बैठकीत असा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

१५५ जागा सोडून इतर जागांवर चर्चा

विधानसभा निवडणुकीसाठी घटक पक्षांच्या विजयी असलेल्या जागा सोडून इतर जागांवर चर्चा होणार आहे. शिवसेना उबाठा, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीन पक्ष १५५ जागा सोडून इतर जागांवर चर्चा करतील. जागा कोणाकडे असली तरी उमेदवार देताना जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊनच उमेदवारी दिली जाणार आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत बुधवारी सकाळी उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी विचारले होते. मुख्यमंत्री म्हणून तुम्ही चांगले काम केले आहे. यामुळे तुम्हीच येत्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असणार का? असे विचारले होते. त्यावेळी त्यांनी हा प्रश्न इतर पक्षांना (काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी) विचारा, असे उत्तर उद्धव ठाकरे यांनी दिले होते. परंतु आता तेच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहे, हे जवळपास निश्चित झाले आहेत.

तीन पक्षांचा वॉररुम एकच

विधानसभा निवडणुकीसाठी तीन पक्षाचा वॉररुम एकच असणार आहे. तसेच एकच अजेंडा घेऊन महाविकास आघाडी जनतेसमोर जाणार आहे. जनतेमध्ये तीन पक्षांत उत्तम एकजूट असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होणार आहे. प्रचारात महाविकास आघाडीतील नेते महत्वाच्या सभांमध्ये एकत्र असणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;