कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अभूतपूर्व गोंधळ, दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई, काय घडलं?

कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर मुंबईत सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये अभूतपूर्व गोंधळ, दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई, काय घडलं?

मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याच्या अचानक फिट आल्याने जागीच मृत्यू झाला आहे. हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी डॉक्टर नसल्याने त्याच्या मृत्यू झाल्याच्या आरोप करण्यात येत आहे. कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर स्थानिक नागरिकांनी आणि मृतक कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी करत गदारोळ केला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच पोलीस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. पोलिसांनी नागरिकांना आणि मृतक कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना शांततेचे आवाहन केलं. अनिश चव्हाण असं मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचं नाव आहे. तो घरी असताना चक्कर येऊन पडला. त्यामुळे त्याला डोक्याला मार लागला होता. यानंतर तो सेंट जॉर्ज रुग्णालयातच उपचारासाठी आला. पण वरिष्ठ डॉक्टर हॉस्पिटलमध्ये नसल्याने त्याला दोन ते अडीच तास उपचार मिळाले नाही, असा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे.

कर्मचाऱ्याच्या मृत्यू नंतर सेंट जॉर्ज रुग्णालयात मोठा गोंधळ उडाला. त्यामुळे रुग्णालयात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पण तरी आक्रमक कर्मचाऱ्यांकडून गोंधळ सुरु होता. यावेळी पोलीस प्रशासनाकडून सर्वांना शांततेचं आवाहन करण्यात आलं. घटनेची माहिती मिळताच डीन पल्लवी सापळे रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. त्यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली जात आहे.

विधानसभा अध्यक्ष हॉस्पिटलमध्ये दाखल

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे देखील घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती दिली. यानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “यावरती कारवाई केली जाईल. जे दोषी आहेत त्यांच्यावरती सकाळपर्यंत कारवाई केली जाईल. मी आलो तेव्हा देखील RMO इथं नव्हते. प्रत्येकाला उपचार देण्याचं काम रूग्णालयातील डॉक्टरांचं आहे. रूग्णालयात घडलेल्या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे”, अशी प्रतिक्रीया राहुल नार्वेकर यांनी दिली. यानंतर लगेच कारवाईदेखील करण्यात आली. याप्रकरणी दोन डॉक्टरांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कारवाई केली. यानंतर विधानसभा अध्यक्ष उद्या दुपारी १२ वाजता विधीमंडळात बैठक घेणार आहेत. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि महत्त्वाचे अधिकारी राहणार उपस्थित राहणार आहेत. रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांना कठोर कारवाई करण्याचे पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;