मुंबईतील सर्वात महागड्या जागेत या व्यक्तीने खरेदी केला वाडा, किंमत ऐकून चक्रावून जाल
पूनावाला अभियांत्रिकी समूहाचे अध्यक्ष आणि दिग्गज उद्योगपती योहान पूनावाला यांनी दक्षिण मुंबईतील कफ परेडमध्ये एक आलिशान वाडा विकत घेतला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वाड्याची किंमत 500 कोटी रुपये आहेत. फायनान्शिअल एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, ही हवेली 30,000 स्क्वेअर फूट परिसरात आहे.
दक्षिण मुंबईतील कफ परेड परिसरात अनेक बड्या उद्योजकांची घरे आहेत. मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ अनिल अंबानी यांचे एक घर येथे आहे. जेथे पूर्वी ते आपल्या कुटुंबासोबत राहत होते.
पुनावाला दाम्पत्याने ही मालमत्ता खरेदी केल्याचं कुठेही अधिकृत समोर आलेलं नाही. पण, मुंबईतील वाढत्या मालमत्तेच्या किमती लक्षात घेता हा सौदा 500 कोटींमध्ये झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
योहान पूनावाला हे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पूनावाला यांचे चुलत भाऊ आहेत. योहान पूनावाला आणि त्यांची पत्नी मिशेल पूनावाला सध्या पुण्यातील पूनावाला हाऊसमध्ये राहतात.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.






Comment List