Uddhav Thackeray : आता शाखा-शाखांमध्ये चिन्हावरुन ‘सामना’; उद्धव ठाकरे यांच्या त्या आदेशामुळे दोन्ही गट आमने-सामने

Uddhav Thackeray : आता शाखा-शाखांमध्ये चिन्हावरुन ‘सामना’; उद्धव ठाकरे यांच्या त्या आदेशामुळे दोन्ही गट आमने-सामने

उद्धव ठाकरे यांनी नुकताच पुण्यात पक्षाच्या मेळाव्यात शिवसैनिकांना एक आदेश दिला. त्यांनी या सभेत अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार प्रहार केला. त्यांनी अत्यंत जहाल भाषेचा वापर केल्यानंतर भाजपने पण तिखट प्रतिक्रिया दिली. शिंदे सेना बाहेर पडल्यानंतर त्यांच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह गेले. तर उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह मिळाले. आता चिन्हावरुन पुन्हा महाभारत होण्याची चिन्हं आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गट आमने-सामने आले आहेत. विधानसभेच्या तोंडावर मुंबईसह राज्यात पुन्हा राडा होण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे यांचा आदेश काय?

पुण्यात 3 ऑगस्ट रोजी पक्षाचा मेळावा झाला. त्यात उद्धव ठाकरे यांनी सभेच्या अखेरीस शिवसैनिकांना एक आदेश दिला. शाखा-शाखांतील बोर्डावर जी धनुष्य-बाणाची निशाणी आहे, ती हटवा आणि त्याठिकाणी मशाल चिन्ह लावा, असा आदेश त्यांनी पदाधिकारी, शिवसैनिकांना दिला. त्यांच्या या आदेशामुळे ज्या ठिकाणी शाखेवरुन वाद सुरु आहे अथवा ज्या ठिकाणी दोन्ही गट मजबूत आहे, तिथे वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. यापूर्वी पण शाखांवरुन दोन्ही गटातील पदाधिकारी भिडल्याचे राज्याने पाहिले आहे. खास करुन ठाणे, मुंबईत हा प्रकार घडला होता.

दोन्ही गट आले आमने-सामने

उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या आदेशामुळे शिंदे गट ठाकरे गट आमने-सामने आले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ठाकरे गटातील पदाधिकारी आपापल्या भागातील धनुष्यबाण काढायच्या कामाला लागले आहेत. परंतु यावरून ठाकरे गट आणि शिंदे गट अनेक भागात आमने-सामने आले. प्रभादेवी भागात अशीच परिस्थिती झाली आहे.

प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिराच्या बाजूला एका लोखंडी बोर्डाच्या तिथे धनुष्यबाणाचे चिन्ह काढत असताना ठाकरे गटातील पदाधिकाऱ्याला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याने मारल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांविरोधात दादर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या निधीतून हे लोखंडी पोस्टर लावले असल्याचं शिंदे गटाचे म्हणणं आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून खोडसाळपणा केल्या असल्याचं शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आरोप केला. मुंबई आणि पुणे येथे झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आपल्याला भागात जिथे जिथे शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आहे ते काढा आणि मशाल लावा असे आदेश दिले आहेत. त्यानुसार ठाकरे गटाचे पदाधिकारी कामाला लागले आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;