Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : राज्यपालपदाचा दिलेला शब्द पूर्ण न केल्यास…’; ‘आनंदराव अडसूळांची भाजपला धमकी

गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांनी भाजप आणि नवनीत राणांवर जोरदार हल्लाबोल केलाय. येत्या 8 दिवसात भाजपनं राज्यपालपदाचा दिलेला शब्द पूर्ण न केल्यास, नवनीत राणांच्या जातप्रमाणपत्राचं प्रकरण बाहेर काढणार असल्याची धमकीच अडसुळांनी दिलीय. नवनीत राणांचं जातप्रमाणपत्र रदद् करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचा गंभीर इशाराही आनंदराव अडसूळांनी दिलाय.

दरम्यान आनंदराव अडसुळांनी ज्या जातप्रमाणपत्रांवरुन नवनीत राणांना इशारा दिलाय.. ते प्रकरण काय आहे? पाहुयात. नवनीत राणांनी 2019 मध्ये अमरावती मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून लोकसभा निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत राणांनी आनंदराव अडसुळांचा पराभव केला.. दरम्यान त्यानंतर अडसूळ यांनी राणांच्या जातप्रमाणपत्रावर आक्षेप घेतला होता.

नवनीत राणा यांनी निवडणूक लढवण्यासाठी चुकीची जात दाखवल्याचा आरोप अडसुळांनी केला होता. त्यांनी स्वत:ची जात मोची अशी सांगितली आहे. मात्र, त्या पंजाबी चर्मकार आहेत, असा दावा अडसूळ यांनी केला होता. अडसूळ यांच्या याचिकेवर निर्णय देताना उच्च न्यायालयानं नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र अवैध ठरवलं होतं. राणांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून मोची जातीचा दाखला मिळवल्याचं उच्च न्यायालयानं 8 जून 2021 रोजी नमूद केलं होतं. उच्च न्यायालयानं त्यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता.. त्यानंतर राणांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी एकमतानं उच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल केला होता.

पाहा व्हिडीओ:-

अमरावती लोकसभेच्या जागेवरुन आनंदराव अडसूळ त्यांचे पुत्र अभिजीत अडसूळ आणि राणां दाम्पत्यामध्ये रस्सीखेच झाल्याचं पाहायला मिळालं होतं.. अडसुळ कुटुंबानं अमरावतीच्या जागेवर आपला दावा सांगितला होतां. मात्र, अमित शाहांनी राज्यपालपदाचा शब्द दिल्यामुळे अमरावतीची जागा सोडल्याचं अडसुळांनी म्हटलंय.. तसंच नवनीत राणांमुळे नुकसान झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय. आनंदराव अडसुळांनी नवनीत राणांवर हल्लाबोल करत राज्यपालपदावरुन भाजपला खुली धमकीच दिलीय. त्यामुळे अडसुळांच्या धमकीनंतर भाजप कोणती पाऊलं उचलणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणारय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;