Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : राज ठाकरे हे सरकारमधलेच- मनोज जरांगेंचा आरोप, पाहा Video

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : राज ठाकरे हे सरकारमधलेच- मनोज जरांगेंचा आरोप, पाहा Video

मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः अप्रत्यक्षपणे सरकारमधलेच एक असून त्यांचं विधान म्हणजे समाजाला उचकवण्याची कामं आहेत, असा आरोप मनोज जरांगेंनी केला. महाराष्ट्रात आरक्षणाची गरजेच नसल्याचं विधान राज ठाकरेंनी केल्यावर धाराशीवमधला मराठा आंदोलक आक्रमक झाले होते. त्यानंतर आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंनीही राज ठाकरेंवर निशाणा साधला.

कालच्या आंदोलनानंतर राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये चर्चा झाली. यावेळी आरक्षणाच्या भूमिकेचा मुद्दा राज ठाकरेंनी मराठी-अमराठीचा मुद्द्यापर्यंत नेला. दुसरीकडे लोकसभेवेळी अनेक कुणबी-मराठा उमेदवार देणाऱ्या प्रकाश आंबेडकरांनी विधानसभेला कुणबी-मराठा उमेदवारांना मतं देवू नका. अशी भूमिका घेतलीय. कुणबी-मराठ्यांपासून सावध राहा असंही त्यांनी विधान केल्यानं बच्चू कडूंनी त्या विधानावरुन सवाल केलाय.

पाहा व्हिडीओ:-

मागण्या मंजूर करणारं वा नाकारणारं सरकार आहे. मात्र नेत्यांची विधानं ही समुहावरुन होत असल्यानं वाद चिघळत चालले आहेत. विशेष म्हणजे 15 दिवसांपूर्वी राज्यात स्फोटक स्थिती असल्याचं म्हणणारे भुजबळ सध्या आरक्षणावरुन होणाऱ्या विधानावरुन मौन आहेत. सत्तेतील नेते संजय शिरसाटांच्या मते सरकारनं ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलंय.

भाजपच्या भूमिकेनुसार ते मराठा समाजास आरक्षण देण्यास कटिब्दध आहे पण ओबीसींना धक्का लागू नये सत्तेतील तिसरा पक्ष अजितदादा गटाचे नेते छगन भुजबळांनी ओबीसींना धक्का लागणार म्हणून मागच्या काळात मोर्चे काढले होतेn आणि यावेळी प्रकाश आंबेडकरांनी ओबीसी आरक्षणाला धोका असल्याचं म्हटलंय.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;