दोघांची नार्को टेस्ट करु या…परमबीर सिंह यांचे अनिल देशमुख यांना चॅलेंज

दोघांची नार्को टेस्ट करु या…परमबीर सिंह यांचे अनिल देशमुख यांना चॅलेंज

माजी आयपीएस अधिकारी परमबीर सिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले होते. त्या आरोपानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख चर्चेत आले होते. आता चार दिवसांपासून अनिल देशमुख पुन्हा चर्चेत आले आहेत. त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस, परमबीर सिंह यांच्यावर आरोप केले आहेत. मनसुख हिरेन यांच्या खून प्रकरणात परमबीर सिंह यांना अटक होणार होती. त्यामुळे ते फडणवीस यांना शरण गेले आणि माझ्यावर आरोप केले, असे अनिल देशमुख यांनी म्हटले. त्याला आता परमबीर सिंह यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना उत्तर दिले.

 

शरद पवार, जयंत पाटील यांनाही सांगितले होते…

सचिन वाझे दोन दिवसांपूर्वी म्हणाले होते की, अनिल देशमुख यांनी सांगितल्यानंतर ते वसुली करत होते. कुंदन शिंदे मार्फत अनिल देशमुख यांच्यापर्यंत पैसे पोहचवले जात होते. त्या आरोपावर बोलताना परमबीर सिंह म्हणाले की, सचिन वाझे आणि इतर अधिकाऱ्यांनी मला हा सर्व प्रकार सांगितला होता. त्यामुळेच मी मुख्यमंत्र्यांना आणि राज्यपालांना पत्र लिहिले. हे पत्र लिहिण्यापूर्वी मी मुख्यमंत्री, शरद पवार, जयंत पाटील यांच्या कानावर हा सर्व प्रकार टाकला होता. त्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे पत्र लिहिले. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व प्रकरणाची चौकशी झाली. त्या चौकशीत अनिल देशमुख दोषी आढळले. त्यानंतर ते कारागृहात गेले.

दोघांची नार्के टेस्ट करु या…

मनसुख हिरेन हत्या प्रकरण असो की अंबानी यांच्या अँटलिया निवासस्थानाबाहेर बॉम्ब ठेवल्याचे प्रकरण असो, त्यातील सत्य तुम्ही लपवले, सांगितले नाही. तुम्हाला बोलवल्यानंतर माहिती दिली नाही, असा आरोप अनिल देशमुख करत आहेत. त्यावर परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख आणि माझी दोघांची नार्को चाचणी करावी, सर्व सत्य समोर येईल, असे आव्हान दिले.

ते पुढे म्हणाले, मी सत्य माहिती दिली नाही तर माझ्यावर कारवाई का केली नाही? अनिल देशमुख यांनी जे आरोप केले आहेत, त्यासंदर्भात त्यांनी त्यावेळी माझी चौकशी का केली नाही? माझ्यावर कारवाई का केली नाही? माझी तीन वेळा एनआयएकडे चौकशी झाली. त्या चौकशीत काहीच आढळले नाही. त्यामुळे आता आपण दोघे नार्के टेस्ट करु या, असे परमबीर सिंह यांनी म्हटले आहे. सचिन वाझे पुन्हा पोलीस दलात अनिल देशमुख यांच्या आदेशानंतरच आले होते, असे त्यांनी सांगितले.

ही ही वाचा…

अनिल देशमुखांचा पुत्र माझा पाया पडत होता, माफी मागत होता, चूक झाल्याचे सांगत होता… माजी IAS परमबीर सिंह यांचा सर्वात मोठा दावा

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;