मुंबईकरांनो आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, महापालिकेने दिली मोठी गुडन्यूज

मुंबईकरांनो आता वर्षभर पाण्याचे नो टेन्शन, महापालिकेने दिली मोठी गुडन्यूज

Mumbai Middle Vaitarna Dams : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणक्षेत्रातही चांगला पाऊस होताना दिसत आहे. सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक धरण ओव्हरफ्लो होताना दिसत आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता मुंबईकरांसाठी आणखी एक गुडन्यूज समोर आली आहे. मुंबईतील पाचवा तलाव ओव्हर फ्लो झाला आहे.

वैतरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु

मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांपैकी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ हे तलाव आज ओव्हरफ्लो झाले. रविवारी 4 ऑगस्ट 2024 रोजी पहाटे 2 वाजून 45 मिनिटांनी हे धरण पूर्णपणे भरले. यानंतर या तलावाचे दोन दरवाजे उघडण्यात आले. सध्या या वैतरणा धरणातून 706.30 क्युसेक या दराने पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जलअभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

जलाशयांची पाणी पातळी वाढली

गेल्याच महिन्यात तुळशी, विहार, मोडक सागर, तानसा हे तलाव ओसंडून वाहू लागले होते. त्यापाठोपाठ आज ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ देखील पूर्ण भरले आहे. यानुसार यंदाच्या पावसाळ्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या 7 तलावांपैकी 5 तलाव आतापर्यंत पूर्ण क्षमतेने भरले आहेत. मागील काही दिवसांमध्ये पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे.

७ तलावांमध्ये ८९.१० टक्के जलसाठा

आज मध्यरात्री भरलेल्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशयाची कमाल पाणी साठवण क्षमता ही 193,530 दशलक्ष लीटर (19,353 कोटी लीटर) इतकी आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात 102.4 मीटर उंचीचे आणि ५६५ मीटर लांबीचे मध्य वैतरणा धरण सन 2014 मध्ये पूर्ण केले. हे धरण महानगरपालिकेने विक्रमी वेळेत बांधून पूर्ण केले होते. या धरणाचे नामकरण ‘हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय’ असे करण्यात आले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या या 7 धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. सध्या सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९.१० टक्के इतका जलसाठा आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;