Chitra Wagh : महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची…अनिल देशमुखांवर तिखट प्रतिक्रिया; चित्रा वाघ यांचे आता उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान काय

Chitra Wagh : महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची…अनिल देशमुखांवर तिखट प्रतिक्रिया; चित्रा वाघ यांचे आता उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान काय

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात भाजपने मोर्चा उघडला आहे. अनिल देशमुख यांनी गेल्या आठवड्यात भाजपवर आरोप केले होते. त्याचवेळी भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी त्यांना सज्जड पुराव्यानिशी उत्तर देण्याचा इशारा दिला होता. तर आता मुंबई पोलीस दलातून बडतर्फ झालेला अधिकारी सचिन वाझे याने देशमुखांवर आरोपांचा मोठा बॉम्ब टाकला. ते पीएमार्फत पैसे घेत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. याविषयीची नार्को टेस्टसाठी पण तयारी दाखवली. त्यानंतर आता चित्रा वाघ यांनी दारुगोळ्यासह महाविकास आघाडीवर तोफ डागली.

आरोपांची सखोल चौकशीची मागणी

सचिन वाझेने अनिल देशमुखांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर असून देशमुखांचा काळा बुरखा टराटरा फाटला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार सत्तेवर असताना पैसे मागितले जात होते, असे सचिन वाझेने सांगून टाकले आहे. याचे पुरावे गृहखात्याकडे त्याने दिल्याचे आणि तशा आशयाचे पत्र त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्याचे सांगितले आहे. आमची मागणी आहे की याची सखोल चौकशी केली जावी, असे चित्रा वाघ म्हणाल्या.

शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप

निलंबित असताना अनिल देशमुख यांनी पुन्हा नोकरीवर घेण्यासाठी आणि ते पैसे शरद पवारांना देण्यासाठी दोन कोटी रुपये मागितले होते, असा गंभीर आरोप पण त्यांनी केला. हे प्रकरण जनता विसरलेली नाही, असे त्या म्हणाल्या.  समित कदम नावाच्या व्यक्तीला देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे पाठवलं असं थेट नाव घेत अनिल देशमुख यांनी आरोपांची राळ उडवली होती.  देवेंद्र फडणवीसांचं आव्हान अप्रत्यक्षपणे स्वीकारून अनिल देशमुखांनी त्यांच्यावर एका मागून एक आरोपांची राळ उडवल्यानंतर आता भाजपने बॉम्बगोळे सुरु केले आहेत.

उद्धव ठाकरे यांना केले आव्हान

सचिन वाझेविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भर सभागृहात त्याची पाठराखण केली होती. सचिन वाझे म्हणजे लादेन आहे का? असे बेजबाबदार वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले होते, हे देखील सर्वश्रुत आहे. आज पुण्यात उद्धव ठाकरे यावर बोलतील का? महाराष्ट्रातील जनतेला या वसुली गँगची अधिक माहिती देतील का…? याची आम्ही वाट पहातोय, असा टोला त्यांनी लगावला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;