Tomato Price : आनंदवार्ता, टोमॅटोचा भाव आला अर्ध्यावर; पण इतर भाज्या महाग

Tomato Price : आनंदवार्ता, टोमॅटोचा भाव आला अर्ध्यावर; पण इतर भाज्या महाग

टोमॅटोने ग्राहकांना मोठा दिलासा दिला. दोन महिन्यापासून टोमॅटोचा भावाने शंभरी गाठली होती. तर उत्तर भारतात टोमॅटोचा आलेख गेल्यावर्षीप्रमाणे वाढत होता. पण केंद्र सरकारने वेळीच हस्तक्षेप केला. तर राज्यात टोमॅटोचे उत्पादन वाढले. त्यांची आवक वाढली. मोठ्या प्रमाणात टोमॅटो बाजारात आल्याने मुंबईसह राज्यातील अनेक भागात टोमॅटोचा दर अर्ध्यांहून खाली आला. पण इतर काही भाज्या महागच असल्याचा ग्राहकांचा सूर आहे.

श्रावणाच्या तोंडावर ग्राहकांना दिलासा

श्रावण महिना सुरु होत आहे. 5 ऑगस्ट रोजी पहिला श्रावण सोमवार आहे. या काळात मोठ्या प्रमाणावर नागरिक केवळ शाकाहारच करतात. आता टोमॅटो आणि इतर काही भाज्यांचे दर घसरल्याने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. टोमॅटोचा भाव काही भागात 100 तर काही ठिकाणी 80 रुपये होता. आता या किंमती 40 ते 48 रुपये प्रति किलोवर आल्या आहेत. आता श्रावण महिन्यात भाजीपाल्याला मोठी मागणी असणार आहे. टोमॅटोच्या किंमती कमी झाल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे.

आवक वाढल्याने किंमतीत घसरण

मुंबईसह आसपासच्या बाजारात टोमॅटोची आवक वाढली आहे. जून महिन्यात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली. त्यामुळे बाजारात आता आवक वाढली. ऑगस्टच्या या दोन दिवसांत मोठ्या प्रमाणात आवक वाढली. चांगल्या प्रतिच्या टोमॅटोला किलोमागे 20 रुपये तर सर्वात लहान टोमॅटोला किलोमागे 8 रुपयांचा भाव देण्यात आला आहे. महाराष्ट्रातील विविध भागातून मुंबईत टोमॅटोची आवाक होते.

APMC बाजारात काही दिवसांपूर्वी टोमॅटोचा किरकोळ भाव हा 80 रुपये प्रति किलो होता. तर चांगल्या दर्जाचा टोमॅटो हा 100 रुपये प्रति किलो मिळत होता. आता हा भाव 40-45 रुपये प्रति किलोवर आला आहे. किंमती घसरल्याने ग्राहकांनी टोमॅटोची जादा खरेदी सुरु केली आहे. मागणी वाढली आहे. एपीएमसी बाजारात दोन दिवसांपूर्वी प्रतिकिलो 30-40 रुपये असलेले भाव आज 20-25 रुपयांवर स्थिरावले आहेत. बंगळरूमधील टोमॅटोची आवक वाढली असल्याने टोमॅटोचे दर कमी झाले आहे

टोमॅटोचे दर हळूहळू आटोक्यात येत आहेत मात्र भाज्यांचे दर आजुनही वाढताना दिसत आहे वाटाणे प्रति 100 किलो तर भेंडी, गवार, पापडी आदी भाज्यांचे दर 60 ते 70 किलो आहे त्यामुळे ग्राहकांना अजूनही या महागाईचा सामना करावा लागत आहे

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;