‘लाडकी बहीण’ योजनेत महत्वाचे अपडेट, प्रत्येक तालुक्यात छाननी कक्ष, तीन शिफ्टमध्ये काम

‘लाडकी बहीण’ योजनेत महत्वाचे अपडेट, प्रत्येक तालुक्यात छाननी कक्ष, तीन शिफ्टमध्ये काम

mukhyamantri majhi ladki bahin yojana: ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यभरात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. सेतू केंद्र आणि तहसील कार्यालयांमध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. योजनेसाठी अ‍ॅप तयार केल्या गेल्यावर आता वेबसाईट सुरु झाली आहे. प्रत्येक तालुक्यात छाननी कक्ष तयार केले गेले आहे. अर्जांच्या छननीसाठी तीन शिफ्टमध्ये कामे सुरु आहेत. तांत्रिक पडताळणी करण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे निवडक महिलांच्या खात्यात एक रुपया टाकला जात आहे. हा एक रुपया केवळ पडताळणी आहे, तो सन्मान निधी नाही, असे स्पष्टीकरण महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

अशी सुरु आहे प्रक्रिया

लाडकी बहीण योजनेसाठी आता तालुका स्तरावर शिबिरे घेतली जात आहे. त्यात पात्र महिलांचे अर्ज भरले जात आहेत. पालकमंत्री या योजनेवर लक्ष ठेऊन आहेत. योजनेसाठी आलेल्या सर्व अर्जांची छाननी तालुकास्तरावरच केली जात आहे. त्यासाठी तालुक्यात छाननी कक्ष तयार केला आहे. त्या छननी कक्षात तीन शिफ्टमध्ये कामे सुरु केली आहे. तसेच ऑनलाईन दाखल झालेल्या अर्जांवर तालुकानिहाय मंजुरीची प्रक्रिया सुरु आहे. योजनेसाठी ऑफलाईन आलेल्या अर्ज ऑनलाईन केले जात आहे.

योजनेसाठी अ‍ॅपनंतर वेबसाईट

लाडकी बहीण योजनेसाठी ‘नारीशक्ती दूत’ हे अ‍ॅप यापूर्वीच सुरु झाले होते. त्यानंतर आता १ ऑगस्ट २०२४ पासून वेबसाईट सुरु केली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. महिलांना आपले अर्ज https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळ (पोर्टल) दाखल करता येणार आहे. दोनच दिवसांत वेबसाईटवरुन 25 हजार जणांचे अर्ज आले आहे.

काही महिलांच्या खात्यात एक रुपया

लाडकी बहीण योजनेचा निधी १ जुलै पासून मिळणार आहे. योजनेसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत ऑगस्ट अखेरपर्यंत आहे. योजनेत तांत्रिक पडताळणी केली जात आहे. त्यामुळे निवडक पात्र महिलांच्या खात्यात एक रुपया जमा करुन तपासणी केली जात आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होणार आहे. एक रुपया एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;