रेल्वेची जोरदार कामगिरी, मध्यरात्री दोन वाजता दरड कोसळली, सहा वाजता कामगिरी फत्ते, पुणे-मुंबईकरांची कोंडी टळली

रेल्वेची जोरदार कामगिरी, मध्यरात्री दोन वाजता दरड कोसळली, सहा वाजता कामगिरी फत्ते, पुणे-मुंबईकरांची कोंडी टळली

मुंबईवरुन कोकणात जाणाऱ्या रेल्वे मार्गावर पावसाळ्यात दरड कोसळण्याचे प्रकार घडत असतात. तसेच प्रकार पुणे-मुंबई आणि मुंबई-नाशिक रेल्वेमार्गावर पावसाळ्यात होतात. त्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प होत असल्याचा अनुभव अनेक वेळा येतो. शुक्रवारी पुणे-मुंबई रेल्वे सेवा ठप्प होण्याची धोका निर्माण झाला होता. कारण मध्यरात्री या मार्गावर दरड कोसळली. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांनी भर पावसात मध्यरात्रीच काम सुरु केले. सकाळी सहा वाजेपर्यंत रस्ता मोकळा करुन दिला. यामुळे पुणे-मुंबई रेल्वे प्रवास सकाळी सुरळीत सुरु झाला. खंडाळा घाटात ही दरड कोसळली होती.

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दरड

खंडाळा घाटात मध्य रेल्वेच्या मिडल लाईनवर दरड कोसळल्याची घटना गुरुवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडली. लोणावळ्यालल जवळील मंकीहिलच्या आधी असलेल्या बॅटरीहिल जवळ किलोमीटर क्रमांक 120/121 दरम्यान हा प्रकार घडला. माती आणि काही दगड रेल्वे लाईनवर आल्याने सदर लाईन बंद पडली होती. पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर दरड कोसळली होती. चार तासांच्या प्रयत्नानंतर ही दरड हटवण्यात यश आले.

चार तासांत कामगिरी फत्ते

खंडाळा घाटातील रेल्वेची अप लाईन आणि डाऊन लाईन सुरू असल्याने रेल्वे सेवा फारशी प्रभावित झाली नाही. काही वेळेच्या दिरंगाईने रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू होती. दरम्यान पहाटे 2 वाजता खाली आलेली ही दरड सकाळी 6 वाजेपर्यंत बाजूला करून मिडल लाईन वाहतुकीसाठी पुन्हा चालू करण्यात रेल्वे प्रशासनाला यश मिळाले आहे.

रेल्वेने युद्धपातळीवर काम करुन रेल्वे लाईनवर पडलेला माती आणि मलबा हटवण्याचे काम केले. पाऊस सुरु असतानाही रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी ही कामे केली. त्यामुळे शुक्रवारी सकाळी चाकरमान्यांना वेळेवर येणे शक्य झाले. रेल्वेच्या या कामगिरीचे मुंबई-पुणे नियमित प्रवास करणाऱ्यांनी कौतूक केले आहे. हजारो व्यक्ती पुणे-मुंबई रेल्वेने नियमित प्रवास करत असतात.

हे ही वाचा…

कोकणातील चाकरमान्यांना गणपती बाप्पा पावला, विशेष रेल्वेच्या 278 फेऱ्या

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;