धक्कादायक,गेल्या 7 महिन्यात लोकल प्रवासात 1161 प्रवाशांचा बळी, 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेला मुहूर्त केव्हा?

धक्कादायक,गेल्या 7 महिन्यात लोकल प्रवासात 1161 प्रवाशांचा बळी, 5 व्या आणि 6 व्या मार्गिकेला मुहूर्त केव्हा?

मुंबईची लाईफ लाईन अक्षरश: डेथ लाईन बनली आहे. लोकलचा प्रवास धकाधकीचा बनला आहे. लोकल ट्रेनचे रोजचे बिघाड आणि गाड्यांना होत असलेला उशीर त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या पिकअवरमध्ये लोकलमधून लटकून प्रवास करावा लागत आहे. तसेच लोकल पकडण्याचा नादात देखील प्रवाशांचा पडून मृत्यू होत आहे. अर्थातच रेल्वे रुळ ओलांडताना सर्वाधिक मृत्यू होत आहेत. गेल्या सात महिन्यात तब्बल 1161 प्रवाशांचा लोकल प्रवासात मृत्यू झाला आहे. दररोज सरासरी पाच प्रवाशांचा बळी गेला आहे. गेल्या सात महिन्यात जानेवारी 2024 ते 27 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनूसार तिन्ही मार्गांवर मिळून 1161 प्रवाशांचे विविध लोकल अपघातात मृत्यू झाले आहेत.

मुंबईत लोक सकाळी उत्तरेकडून दक्षिण दिशेकडील आपल्या कार्यालयात जाण्यासाठी प्रवास करीत असतात. या प्रवासात कर्जत – कसारा हून सकाळी पिकअवरमध्ये दक्षिण मुंबईतील कार्यालयात पोहचण्याची घाई असते. नंतर सायंकाळी हीच गर्दी उलट दिशेला असते. नेमका त्याच वेळी एखादा बिघाड झाल्यास लोकल ट्रेनला मोठी गर्दी होते. सर्वांना् घरी जायची घाई असते. आणि यातून अपघात घडत असतात. पश्चिम रेल्वेवर डहाणू ते चर्चगेट तर मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर पनवेल ते सीएसएमटी असा प्रवास सुरु असतो. मध्य रेल्वे मुख्य मार्ग, हार्बर आणि ट्रान्सहार्बर अशा तिन्ही मार्गावर तीन हजाराहून अधिक लोकल फेऱ्या चालविण्यात येतात. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याणपर्यंत मध्य रेल्वेकडे ( दोन धिम्या अप आणि डाऊन आणि दोन जलद अप आणि डाऊन ) चार मार्गिका आहेत. परंतू कल्याणच्या पुढे कर्जत आणि कसारा येथे प्रत्येकी एकच मार्ग ( अप आणि डाऊन ) असल्याने लोकल बिघाड झाल्यास संपूर्ण मार्ग ठप्प होतो.

हार्बरच्या प्रवाशांचे होणार वांदे

मुंबईची लाईफ लाईन समजल्या जाणाऱ्या लोकलमधून दररोज 75 लाख प्रवासी प्रवास करतात. लोकलमध्ये सकाळ आणि संध्याकाळच्या पिकअवरला बिघाड झाल्यास अपघात घडतात. मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तिन्ही प्रमुख मार्गावर मिळून सात महिन्यात 1161 प्रवाशांना प्राण गमवावा लागला आहे. मध्य रेल्वेचा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प गेली अनेक वर्षे रखडला आहे. परळ ते सीएसएमटी असा हा पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प झाल्यास लांबपल्ल्यांच्या गाड्यांना स्वतंत्र मार्गिका मिळून उपनगरीय लोकलची संख्या वाढविणे शक्य होईल असे म्हटले जात आहे. आता पुन्हा मध्य रेल्वेने हार्बर मार्गिका सँडहर्स्ट रोडपर्यंत तोडून हार्बरच्या या मार्गिकांना पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी सॅंडहर्स्ट रोड ते सीएसएमटीपर्यंत वापरण्याची जुनी योजना पुन्हा बाहेर काढली आहे. यामुळे हार्बरच्या प्रवाशांचा प्रचंड तोटा होणार आहे. कारण पनवेलवरुन येणाऱ्या प्रवाशांना सँडहर्स्ट रोड येथे उतरुन टॅक्सी किंवा बसने सीएसएमटी गाठावे लागणार आहे. हार्बरचे शेवटचे स्थानक आता पी.डीमेल्लो रोडच्या जागेत करण्याची योजना आहे.

लोकलचे सात महिन्यातील अपघात बळी

जानेवारीत – 171

फेब्रुवारीत – 152

मार्चमध्ये – 165

एप्रिलमध्ये – 179

मे – 182

जूनमध्ये – 135

जुलैमध्ये – 177

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;