मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अंबरनाथ-कर्जत मार्गावर परिणाम

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, अंबरनाथ-कर्जत मार्गावर परिणाम

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडी बदलापूर जवळ थांबली आहे. त्यामुळे अंबरनाथ ते कर्जत लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेवर बिघाड आता प्रवाशांना रोजच सहन करावा लागत आहेत. रोज लोकल सेवा उशिराने धावत असल्याने लोकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. कार्यालय सुटण्याची वेळ झाली असून चाकरमानी घरी परतण्याच्या वेळेसच सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

अंबरनाथ येथून कर्जतकडे जाणाऱ्या अनेक गाड्या खोळंबल्या आहेत. त्यामुळे सीएसएमटी ते अंबरनाथ लोकल सेवा सुरु असून पुढील सेवा सुरळीत करण्याचं काम सुरु आहे.

मध्य रेल्वे गेल्या काही दिवसांपासून उशिराने धावत आहे. पाऊस सुरु असला की मध्य रेल्वेवर त्याचा नेहमीच परिणाम होत असतो. पण इतर तांत्रिक गोष्टींमुळे देखील मध्य रेल्वे अनेकदा विस्कळीत होत असते. मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या खूपच जास्त आहे. त्यामुळे वाहतूकीवर प्रंचड ताण असतो. मध्य रेल्वेची वाहतूक कधी व्यवस्थित होणार असा प्रश्न प्रवाशांना पडला आहे.

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;