मुंबईतील 112 वर्षे जूना ब्रिटिशकालीन पूलचा शेवटचा दिवस, चार भागांना जोडणार पूल बंद होणार असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न

मुंबईतील 112 वर्षे जूना ब्रिटिशकालीन पूलचा शेवटचा दिवस, चार भागांना जोडणार पूल बंद होणार असल्याने वाहतूक कोंडीचा प्रश्न

देशात अजून अनेक ठिकाणी ब्रिटीशकाळातील पूल आहेत. या पुलांचे आयुष्य संपलेले आहे. त्यामुळे हे पूल पाडून काही ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती केली जात आहे. त्याच प्रक्रियेत धारावीचे ह्रदय म्हटले जाणारा सायन पूलचा क्रमांक लागला आहे. सायन स्थानकातील 112 वर्षे जूना ब्रिटिशकालीन पूल 1 ऑगस्टपासून बंद करण्यात येणार आहे. हा पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. त्यासाठी 50 कोटी खर्च येणार आहे. दोन वर्षांत या पुलाचे काम पूर्ण होणार आहे. मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेकडून हे काम करण्यात येत आहे.

वाहतुकीची कोंडी होणार

112 वर्षे जुना असलेला आणि मुंबई पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा तसेच वाहतूक व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ऐतिहासिक पुलाचा आज शेवटचा दिवस आहे. 31 जुलैपर्यंत या ठिकाणी वाहतूक सुरु ठेवण्यात येत आहे. 1 ऑगस्टपासून हा पूल बंद करण्यात येत आहे. हा पूल बंद होणार असल्यामुळे या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

चार भागांना जोडणारा पूल

वांद्रे-कुर्ला संकुल, कुर्ला एलबीएस मार्ग, धारावी आणि शीव यांना जोडणारा हा उड्डाण पूल आहे. त्यामुळे हा पूल बंद झाल्याने मुंबईतील वाहतूक कोंडीची समस्या अधिकच बिकट होणार आहे. नवीन पुलाचे काम 1 ऑगस्ट 2024 ते 31 जुलै 2026 पर्यंत होणार आहे. म्हणजेच येत्या 2 वर्षांत सायन पूर्व-पश्चिम परिसराला जोडणारा सायन ओव्हर ब्रिज पूर्ण होणार आहे. मध्य रेल्वे प्राधिकरणाकडून तोडून नवीन बांधण्यात येणार आहे. यामुळे या मार्गांवरील वाहतूक इतर मार्गाने वळवण्यात येणार आहे.

तीन वेळा पुलाच्या तारखा ढकलल्या

भारतीय तंत्रज्ञान संस्थेने (IIT) 2020 साली केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतर हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे घोषित केले होते. मात्र, परीक्षा आणि लोकसभा निवडणुका असल्यामुळे या काळात प्रवाशांची गैरसोय होईल, नागरिकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागेल. यासाठी स्थानिक रहिवाशांनी विनंती केली होती. त्यामुळे हा पूल पाडण्याच्या तारखा तीन वेळा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. अखेर याला पाडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;