Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : ‘अजित पवार पुण्यात नसताना धरणातून पाणी सुटलं’; धरणावरून टीका ‘सुपारी’चं उत्तर

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट : ‘अजित पवार पुण्यात नसताना धरणातून पाणी सुटलं’; धरणावरून टीका ‘सुपारी’चं उत्तर

पुण्यातल्या पुरावरुन मनसे अध्यक्ष  राज ठाकरेंनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 10 वर्ष जुन्या एका वादग्रस्त विधानाचा वाद छेडला. त्यावरुन बोचरी टीका होताच राष्ट्रवादीनंही राज ठाकरेंना सुपारीबहाद्दर म्हणत उत्तर दिलं.

पुण्यात अजित पवार नसताना धरणातून पाणी सुटलं, अशा शब्दात राज ठाकरेंनी अजित पवारांना डिवचलंय. पुण्यातल्या पूरस्थितीनंतर राज ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी केलेल्या या विधानावर राष्ट्रवादीनं सुपारीबहाद्दरांनी काय बोलावं म्हणून राज ठाकरेंना उत्तर दिलंय.

आधीच पुण्यात पाऊस सुरु असताना पहाटे खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानं पुण्यातली परिस्थिती बिकट बनली. कोणतीही पूर्वसूचना न देता पाणी सोडलं गेल्यानं लोक गाफिल होती. अनेकांची घरं-वाहनं-दुकानं व्यवसायांचं मोठं नुकसान झालं. त्यात आता विमा कंपन्या नैसर्गिक संकट मानून मोबदला देण्यास तयार नाहीत. अशावेळी सरकारनं मदत करायला हवी असं राज ठाकरेंनी म्हटलंय.

पाहा व्हिडीओ:-

पूरस्थितीवेळी पुण्याचे पालकमंत्री अजित पवार विविध भागांची पाहणी करत होते. पूर ओसरल्यानंतर शिंदेंच्या ठाणे आणि पनवेलमधले पालिका कर्मचारी पुण्यात साफसफाईसाठी पाठवले गेले. त्यावरुन राज ठाकरेंनी सरकारवर टिकास्र सोडलंय. दरम्यान 2 महिन्यांपूर्वी मोदींसाठी केंद्रात भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी पुण्याच्या पूरस्थितीसाठी केंद्रालाही जबाबदार धरलंय. सरकारनं महापालिका निवडणुका लांबवल्यानं नगरसेवकही अस्तित्वात नसल्याचं राज ठाकरे म्हणाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;