Video : पळून पळून मारहाण… जत्रा जमली, पण कुणीही वाचवलं नाही; ‘त्या’ रिसॉर्टवर असं काही घडलं… सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

Video : पळून पळून मारहाण… जत्रा जमली, पण कुणीही वाचवलं नाही; ‘त्या’ रिसॉर्टवर असं काही घडलं… सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील नवापूर येखील अर्नाळा बीचजवळ असलेल्या रिसॉर्टमध्ये धक्कादायक घटना घडली. सेवन सी रिसॉर्ट मध्ये एका पर्यटनासाठी आलेल्या कुटूंबाला मारहाण झाली. यामध्ये एका पर्यटकाचा मृत्यू झाला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये म्हटलं आहे. मिलिंद मोरे असं मृत पर्यटकाचं नाव आहे. शिवसेनेचे ठाणे माजी जिल्हा प्रमुख रघुनाथ मोरे यांचे ते सुपुत्र होते. या घटनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली असून सेवन सी रिसॉर्टवर हातोडा फिरवण्यात आला आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून नेमकं काय घडलं जाणून घ्या.

पिकनिकसाठी मयत मिलिंद मोरे आपल्या कुटुंबातील 15 ते 20 जणांसोबत फिरायला गेले होते. संध्याकाळी पिकनिक झाल्यालवर घरी येत असताना रिसॉर्टच्या गेटमधून बाहेर पडताना एका रिक्षाचा त्यांना धक्का लागला. त्यावेळी तिथे त्यांची भांडणे झालीत आणि मिलिंद मोरे आणि त्यांच्यासोबतच्या इतर दोघांना मारहाण झाली.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर लक्षात येईल की त्यावेळी तिथल्या जमावाने त्यांना गेटच्या बाहेर नेत मारहाण केली. त्यावेळी तिथे असलेल्या कोणीही मध्ये पडत वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतरच्या एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे की बोलणं सुरू असताना गाडीजवळ उभे असलेल्या मिलिंद मोरे अचानक चक्कर येऊन खाली कोसळला. त्यावेळी सर्वांनी पळापळ करून मोरे यांना जवळच्या प्रकृती रूग्णलयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

 

या घटनेची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळताच त्यांनी परिमंडळ तीनच्या पोलीस उपायुक्त जयंत बजबळे यांना फोन करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याबाबत नवीन कायद्याच्या कलमान्वय अर्नाळा पोलीस ठाण्यात 7 ते 8 महिला आणि 8 ते 10 अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

या भागात अनधिकृतपणे सुरू करण्यात आलेल्या या रिसॉरर्ट्सच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी अनेकदा पालिका प्रशासनाकडे तक्रार करून ती बंद करावीत अशी मागणी केली होती. मात्र आज अखेर मुख्यमंत्र्यांनी या रिसॉर्टसच्या विरोधात कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर या कारवाईला गती आली आहे. सकाळपासून पलिकेने या रिसॉर्टसह अनेक अनधिकृत रिसॉर्टसवर तोडक कारवाई केली असून ही कारवाई यापुढेही चालु राहणार आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;