नवी मुंबईत तीन मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, तर काही जण दबल्याची भीती

नवी मुंबईत तीन मजली इमारत कोसळली; दोघांचा मृत्यू, तर काही जण दबल्याची भीती

मुसळधार पावसामुळे धोक्कादायक इमारतीतील रहिवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. नवी मुंबईत एक तीन मजली इमारत कोसळली आहे. इंदिरा निवास असे या इमारतीचे नाव आहे. वेळवरच बचाव पथक दाखल झाले आहे.  या घटनेत दोघांचा मृत्यू झाला तर इतर काही जण ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती समोर येत आहे. बचाव पथकाने अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे.

धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर

पावसाळाच्या तोंडावर अनेक धोकादायक इमारतीमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येते अथवा पालिका पथक त्यांना नोटीस तरी देते. इंदिरा निवास इमारतीप्रकरणात पालिकेने काय कार्यवाही केले हे समोर येईलच. पण ही इमारत कमकुवत असल्याचे समोर येत आहे. इंदिरा निवासमध्ये एकूण 13 सदनिका होत्या. त्यात 26 कुटुंब राहत असल्याची माहिती समोर येत आहे.

सध्या मुंबईत पावसाने कहर केला आहे. त्याचा फटका या इमारतीला बसण्याची शक्यता आहे. अजून याविषयीची अधिकृत माहिती समोर आली नाही. इमारत ढासळण्याची माहिती मिळताच NDRF, मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि महापालिकेचे अधिकारी घटनास्थळी पोहचले.

आयुक्तांनी काय दिली माहिती ?

ही इमारत का आणि कोणत्या कारणांमुळे कोसळली याचा तपास करण्यात येणार आहे. अँम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली आहे. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी जवळपास 5:30 वाजता इमारत जमीनदोस्त झाली. ही ग्राऊंडसह तीन मजली इमारत आहे. ती बेलापूर वॉर्डातंर्गत येते. या इमारतीत एकूण 13 सदनिका, फ्लॅट आहेत.

तर नवी मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी पुरुषोत्तम जाधव यांनी घटनाक्रम सांगितला. त्यानुसार, पहाटे 4:50 वाजता विभागाला इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. बचाव कार्य प्रगती पथावर असल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितली हकीकत

प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची हकीकत सांगितली. त्यानुसार, सकाळी उठलोच होतो तर काहीतरी कोसळण्याचा जोरात आवाज झाला. बाहेर येऊन पाहिले तर शेजारची इमारत ही पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. रात्री तर ही इमारत डोळ्यासमोर होती. पण डोळ्यादेखत तिचा ढिगारा झाला. आम्ही लागलीच या घटनेची माहिती संबंधित विभाग आणि अधिकाऱ्यांना दिला. आता घटनास्थळी बचाव कार्य सुरु आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;