विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी तयारी, जागावाटपासाठी समिती केली स्थापन

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची मोठी तयारी, जागावाटपासाठी समिती केली स्थापन

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे कॉंग्रेसच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळविण्यावर काँग्रेसने लक्ष केंदित केले आहे. आगामी विधानसभेसाठी राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमधील सर्वच घटकपक्ष आपल्या पक्षाला जास्तीत जास्त जागा कशा मिळतील याची व्यूहरचना आखत आहेत. त्यात काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले आहे. आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसने मुंबई आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी मित्रपक्ष शिवसेना (UBT) आणि NCP (SP) यांच्याशी चर्चा करण्यासाठी समितीची घोषणा केली. या समितीमध्ये 10 नेत्यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकीत चांगली कामगिरी केल्यानंतर शिवसेना (UBT) विधानसभा निवडणुकीत सुमारे 115 ते 125 जागा लढवण्याच्या तयारीत आहे. तर, काँग्रेसनेही 150 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. त्यामुळे जागावाटपामध्ये या दोन्ही पक्षांना तडजोड करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीही या तिन्ही पक्षांमध्ये जागावाटपाची चर्चा झाली होती. मात्र, त्यातील कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे दिल्ली पक्षश्रेष्ठींनी विधानसभा निवडणुकीसाठी नव्या समितीची घोषण केली.

congress letter

congress letter

दिल्ली पक्षश्रेष्ठींनी जाहीर केलेल्या राज्यस्तरीय समितीमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते नितीन राऊत, नसीम खान आणि सतेज बंटी पाटील यांचा समावेश आहे. तर, मुंबई प्रदेश समितीमध्ये खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप आणि माजी मंत्री अस्लम शेख यांचा समावेश आहे. हे सर्व नेते मित्रपक्षांसोबत जागावाटपाच्या फॉर्म्युल्याबाबत चर्चा करणार आहेत.

दरम्यान, 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत शिवसेना हा NDA चा घटक पक्ष होता. त्यावेळी शिवसेनेने 124 जागांवर निवडणूक लढवली होती. तर, भाजप आणि इतर मित्र पक्षांसाठी 163 जागा सोडल्या होत्या. निवडणुकीनंतर शिवसेनेची एनडीएसोबत युती तुटली आणि शिवसेना महाविकास आघाडीचा भाग बनली. शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. 2022 मध्ये शिवसेनेत फूट पडली आणि एकनाथ शिंदे यांनी 30 हून अधिक आमदारांसह वेगळे होत पुन्हा एनडीएमध्ये सहभागी झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;