रात्रीस खल चाले, शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांची रात्री उशिरा ‘वर्षा’वर बैठक

रात्रीस खल चाले, शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांची रात्री उशिरा ‘वर्षा’वर बैठक

राज्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने गुरुवारी (25 जुलै) अक्षरश: झोडपून काढलं. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडला. पुण्यात तर प्रचंड हाहा:कार झालेला बघायला मिळाला. पुण्यातील सिंहगड रोड परिसरात खडकवासला धरणातून विसर्ग झालेलं पाणी वस्तीत शिरलं. त्यामुळे शेकडो वाहनं, घरे पाण्याखाली गेली. पुण्यातील अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झालं. पुण्यातील परिस्थितीची माहिती मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबईत आधी आढावा घेतला. यानंतर अजित पवार तातडीने पुण्याच्या दिशेला रवाना झाले. त्यांनी पुण्याच्या कंट्रोल रुमला भेट देत आढावा घेतला. यानंतर अजित पवार थेट पुण्याच्या रस्त्यांवर उतरले. त्यांनी नुकसानग्रस्त भागांचा पाहणी केली आणि त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. तसेच अधिकाऱ्यांना मोलाच्या सूचना दिल्या. या सगळ्या घडामोडींनंतर आता रात्री उशिरा महत्त्वाच्या हालचाली घडल्या.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार पुण्याच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर तसेच अधिकाऱ्यांना योग्य आदेश देवून आल्यानंतर आज रात्री पुन्हा मुंबईत परतले. विशेष म्हणजे अजित पवार यांनी मुंबईत परतल्यानंतर लगेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी आधी अजित पवार गेले. यानंतर काही वेळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी दाखल झाले. तीनही नेत्यांमध्ये अवांतर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

नेमकं कोणत्या विषयांवर चर्चा झाल्याची शक्यता?

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये सध्याच्या राज्यातील पावसाच्या परिस्थितीवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. राज्यात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना मदत कशी आणि किती करायची? या विषयावर बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत इतर कोणत्याही विषयांवर चर्चा झालेली नाही, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी सर्व नेते राज्यातील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;