ST Bus Pass : एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजनेला मोठा प्रतिसाद, जूनमध्ये इतक्या विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

ST Bus Pass : एसटी पास थेट तुमच्या शाळेत योजनेला मोठा प्रतिसाद, जूनमध्ये इतक्या विद्यार्थ्यांनी घेतला लाभ

एसटी महामंडळाने शालेय विद्यार्थ्यांना एसटीचे सवलत पास थेट त्यांच्या शाळेत जाऊन वितरित करण्याची ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ योजना जाहीर केली होती. तिला मोठा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांनी या योजनेला लाभ घेतला आहे. एसटीचे सवलत पास थेट मुलांच्या शाळेत वितरित करण्याची योजना 18 जुन पासुन सुरू करण्यात आली होती. आता 12 दिवसात4 लाख 3 हजार 294 विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवास पास वितरित केले आहेत. गेल्या वर्षाच्या जुन महिन्याच्या तुलनेत सुमारे 83 हजारने जास्त आहे. तसेच उत्पन्न 26 कोटी रुपयांनी वाढले आहे. विद्यार्थ्यांनी योजनेला उदंड प्रतिसाद दिला आहे.

या शैक्षणिक वर्षापासून ( जून )  शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन पास वितरित करण्याची योजना एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सुरू केली होती. तसे आदेश स्थानिक एसटी प्रशासनाला दिले. त्यानुसार प्रत्येक आगारातील कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक शाळा महाविद्यालयात जाऊन तेथील विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार प्रवासी पास वितरण करू लागले आहेत. या योजनेला केवळ 12 दिवसांमध्ये उदंड प्रतिसाद मिळाला असून जुलै महिन्यात देखील अशाच पद्धतीने एसटी कर्मचारी थेट शाळेत जाऊन पास वितरण करीत आहेत.

msrtc pass direct to your school scheme huge response, 4 lakh students benefited in June

msrtc pass direct to your school scheme huge response, 4 lakh students benefited in June

रांगेत ताटकळत उभे राहायची गरज नाही

15 जुन पासुन नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झाल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत जाण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांना एसटीत 66 % इतकी सवलत दिली आहे, म्हणजे केवळ 33 % रक्कम भरून विद्यार्थ्यांना मासिक पास काढता येतो. त्याचप्रमाणे शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना मोफत एसटी पासचे वितरण केले जाते. यासाठी विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटीच्या पास केंद्रावर जाऊन रांगेत उभा राहून पास घ्यावे लागत होते. किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापना कडून पास घेतले जात असत. पण यंदापासून विद्यार्थ्यांना पाससाठी आता रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार नाही. त्यांच्या शाळा -महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्याकडून त्या विद्यार्थ्यांना  त्यांचे एसटी सवलत पास थेट शाळेत देण्यात येत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या  वेळेत बचत होत आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;