Prakash Ambedkar : ओबीसी-मराठा आरक्षणाच्या लढाईत आता प्रकाश आंबेडकर यांची उडी; आजपासून ‘वंचित’ ची आरक्षण बचाव रॅली

Prakash Ambedkar : ओबीसी-मराठा आरक्षणाच्या लढाईत आता प्रकाश आंबेडकर यांची उडी; आजपासून ‘वंचित’ ची आरक्षण बचाव रॅली

आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात सातत्याने तणाव वाढत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरक्षण हा महत्वाचा मुद्दा झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केले आहे. त्यांनी राज्य सरकारला आता 13 ऑगस्टपर्यंत निर्णय घेण्याची डेडलाईन दिली आहे. आरक्षणावरुन राज्यात वातावरण तापलेले असताना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या लढाईत उडी घेतली आहे. आजपासून मुंबईतून त्यांची आरक्षण बचाव रॅलीला सुरुवात होत आहे.

राज्यातील या जिल्ह्यातून जाणार यात्रा

वंचित बहुजन आघाडीची आरक्षण बचाव रॅलीची सुरुवात दादर येथील चैत्यभूमीपासून सुरु होत आहे. ही रॅली राज्यातील अनेक जिल्ह्यातून जाणार आहे. मुंबईतून ही यात्रा पुणे येथील महात्मा फुले वाड्यात येईल. त्यानंतर कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशीव, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, अमरावती, अकोला, जालना, बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून आरक्षण बचाव यात्रा जाणार आहे. ७ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मोठी सभा होणार आहे. या ठिकाणी ही रॅली थांबणार आहे.

महाराष्ट्रात सलोखा कायम रहावा यासाठी आरक्षण यात्रा

महाराष्ट्रात वनवा पेटू नये. महाराष्ट्र शांत रहावा. सलोखा टिकून रहावा या दृष्टिकोनातून आम्ही 25 तारखेपासून आरक्षण बचाव यात्रा सुरू करत आहोत. उद्या चैत्यभूमीपासून ही यात्रा सुरू होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभा होऊन या यात्रेची सांगता होणार असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.

ओबीसी समाज दहशतीत

ॲड. आंबेडकर म्हणाले की, एकीकडे ओबीसी समाज प्रचंड घाबरलेला आहे. विशेषतः छोटा ओबीसी घटक घाबरलेला आहे. 12 दिवसांत लहान ओबीसी नेत्यांवर हल्ला झाला आहे. नाभिक समाजाची दुकाने जाळली आहेत. जी माहिती आमच्यापर्यंत आलेली आहे की, लहान ओबीसींच्या दुकानावर जायचे नाही, काही विकत घ्यायचे नाही असेही आदेश निघाले आहेत. ही परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे. मध्यंतरी शरद पवार यांचे स्टेटमेंट होते की, आम्ही विधानसभेला 225 आमदार निवडून आणणार आहोत. यामुळे राज्यातील परिस्थिती अजून भयाण झालेली असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्रातील ओबीसी नेत्यांना, संघटनांना पक्षाच्या वतीने आम्ही निमंत्रणाचे पत्र लिहिले आहे ते यामध्ये सामील होत आहेत. शरद पवार हे विरोधी पक्षात आहेत त्यांनाही या यात्रेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केले आहे. शांतता प्रस्थापित करणे आणि जनजागृती करणे हा आरक्षण बचाव यात्रेचा हेतू असल्याचेही ॲड. आंबेडकर यांनी नमूद केले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;