खुशखबर ! मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण ओव्हर फ्लो
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आली आहे. आज सायंकाळीयांचा मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरणांपैकी एक तानसा हे धरण चार वाजून पंधरा मिनिटांनी दोन दरवाजे ओपन होऊन तुडुंब भरून वाहू लागले आहे.
बृहनमुंबई महानगरपालिकेच्या या धरणाची ओसंडून वाहण्याची पातळी १२८.६३ मी.टीएचडी इतकी आहे. तानसा धरण परिसरात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
धरण जवळपास भरलं आहे. त्यामुळे तानसा धरणा लगतच्या आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांना दक्ष राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List