Central Railway Update : ओव्हरहेड वायर वर बांबू पडला, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप देणारी बातमी, VIDEO

Central Railway Update : ओव्हरहेड वायर वर बांबू पडला, मध्य रेल्वेच्या प्रवाशांना मनस्ताप देणारी बातमी, VIDEO

लोकल सेवा ही मुंबईची जीवन वाहिनी आहे. दररोज लाखो लोक मुंबई लोकलने प्रवास करतात. रोजच्या प्रवाशांचा आकडा 70 लाखाच्या पुढे आहे. मुंबईच्या एका टोकावरुन कर्जत-कसारा या दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी लोकल सेवा उत्तम पर्याय आहे. कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचता येतं, म्हणून मुंबईकरांची पहिली पसंती लोकल सेवेला आहे. रस्ते मार्गापेक्षा रेल्वे मार्गाने प्रवास अधिक जलद होतो. पण मुंबईत लोकल प्रवास हा सहज, सोपा नाहीय. लोकल प्रवाशांच्या अनेक समस्या आहेत. पाऊस, ओव्हर हेड वायरच तुटणं, सिग्नल यंत्रणेत बिघाड याचा मोठा फटका लोकल प्रवाशांना सहन करावा लागतो.

मागच्या काही दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची सेवा वारंवार कोलमडली आहे. पावसामुळे रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे लोकल विलंबाने धावतात. त्याचा फटका मुंबईकरांना सहन करावा लागतो. मागच्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिट विलंबाने धावत असल्याच्या अनेक बातम्या आल्या आहेत. लोकलला नियोजित वेळेपक्षा काही मिनिट जरी उशिर झाला, तरी रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची गर्दी उसळते. मग, अशा खच्चून भरलेल्या गर्दीतून मुंबईकरांना प्रवास करावा लागतो.

आज मध्य रेल्वे कशामुळे विस्कळीत

आज बुधवारी पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणारी जलद मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. ओव्हरहेड वायर वरती बांबू पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. माटुंगा स्टेशनच्या जवळ कन्ट्रक्शन साईटचा बांबू ओव्हरहेड वायर वर  पडला. अनेक प्रवाशांनी ट्रॅकवर उतरुन पायी चालत जाणं पसंत केलय. सकाळी ऐन कामावर पोहोचण्याच्यावळी अशा घटना घडत असल्याने प्रवाशांमध्ये संतप्त भावना आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;