‘2 हजार रुपयांच्या दंडासाठी आम्हाला दोन दिवस वाढवून द्या’, ठाकरे आणि राऊतांची कोर्टाकडे मागणी

‘2 हजार रुपयांच्या दंडासाठी आम्हाला दोन दिवस वाढवून द्या’, ठाकरे आणि राऊतांची कोर्टाकडे मागणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी दाखल केलेल्या मानहानी प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना प्रत्येकी 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. हे पैसे जमा करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून विशेष कोर्टात दोन दिवसांचा कालावधी वाढवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. ही मागणी विशेष कोर्टाने मान्य केली आहे. पण या मुद्द्यावरूनही कोर्टात दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद झाला. अखेर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्याने विशेष कोर्टाने दंड भरण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी वाढवून दिला.

उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी युक्तिवाद केला की, आम्हाला 14 जूनला याबाबतचा आदेश प्राप्त झाला. पण त्याचवेळी कोर्टाचं कॅश काउंटर हे पुढच्या दोन दिवसांसाठी बंद होतं. आम्ही आपल्या बाजूने दंड भरण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले. पण दंडाची रक्कम भरली गेली नाही. यानंतर दंडाची रक्कम भरण्याचा कालावधी संपल्यानंतर 10 दिवसांनी कॅश काउंटवर असलेल्या अधिकाऱ्यांनी पैसे घेण्यास विरोध केला. त्यामुळे दंडाची रक्कम भरण्यासाठी कमीतकमी दोन दिवसांची मुदत द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली.

ठाकरे गटाच्या वकिलांच्या युक्तिवादाला राहुल शेवाळे यांच्या वकील चित्रा साळुंखे यांनी विरोध केला. ठाकरे गटाच्या उदासीन मानसिकतेमुळेच दंडाची रक्कम भरली गेली नाही. ठाकरे आणि राऊतांची मुद्दाम उशिर करण्याची रणनीती आखली आहे, असा युक्तिवाद शेवाळेंच्या वकिलांनी केला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना दंडात्मक रक्कम दोन दिवसांत भरण्यासाठी परवानगी दिली. दोन्ही नेत्यांनी दंडात्मक रक्कम भरण्यास का उशिर झाला याबाबत केलेलं स्पष्टीकरण पाहता त्यांनी जाणूनबुजून विलंब केलेला नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे त्यांचा विलंब माफीचा आर्ज मान्य करण्यात येत असल्याचं न्यायालयाने म्हटलं.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेनेचं मुखपत्र मानलं जाणाऱ्या सामना वृत्तपत्रात आपल्या बदनामीचा मजकूर छापण्यात आल्याचा आरोप करत राहुल शेवाळे यांनी कोर्टात धाव घेतली आहे. राहुल शेवाळे यांनी कोर्टात मानहानीचा दावा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी माझगाव मॅजिस्ट्रेट कोर्टात सुरु आहे. कोर्टाने या प्रकरणात ठाकरे आणि राऊतांची मुक्तता करण्यास स्पष्ट नकार दिला होता. तसेच त्यांना कोर्टात सुनावणीसाठी हजर राहण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आला होता. याबाबतचा आदेश 26 ऑक्टोबर 2023 ला देण्यात आला होता.

खंरतर नियमानुसार दोन्ही नेत्यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या आदेशाला तातडीने वरिष्ठ कोर्टात आव्हान देणं अपेक्षित होतं. त्यासाठी आदेशानंतर 84 दिवसांचा कालावधी असतो. पण ठाकरे आणि राऊतांना तेच करण्यात उशिर झाला. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी याप्रकरणी विशेष कोर्टात धाव घेतली. यावेळी विशेष कोर्टाने मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निर्णय रद्द करण्यासाठी जी याचिका दाखल केली तिला उशिर झाल्याचा मुद्दा नमूद करत 2 हजार रुपयांचा दंड सुनावला होता. याबाबत दंडाचा आदेश 13 जूनला देण्यात आला होता. पण तरीही ठाकरे आणि राऊतांकडून दंडात्मक पैसे भरण्यात आले नाहीत. आता त्यांना कोर्टाच्या आदेशानुसार पुढच्या दोन दिवसात पैसे भरणं अनिवार्य आहे. दरम्यान, या प्रकरणात आता पुढील सुनावणी 31 जुलैला होईल.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;