पहिल्यांदाच इशारा… तानसा भरून वाहणार, ‘या’ गावांसाठी काय अलर्ट?

पहिल्यांदाच इशारा… तानसा भरून वाहणार, ‘या’ गावांसाठी काय अलर्ट?

ेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात कोसळणाऱ्या पावसाने मुंबई महानगर पालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या तुळशी तलाव ओसंडून वाहत असताना आता तानसा धरण देखील भरुन वाहण्याचा इशारा पालिकेने दिला आहे. तानसा धरणाची पातळी 127.51 मी.मी. टीएचपी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून वाहण्याची पातळी 128.63 मी. टीएचपी इतकी आहे. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असल्याने धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजूबाजूच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

तानसा धरणाखाली आणि तानसा नदीलगतच्या परिसरातील शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नवेरे, वेलवहाळ, डिंबा आणि खैरे. भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळूंगे आणि गणेशपुरी, वाडा तालुक्यातील निभावली, मेट, गोरांड, वसई तालुक्यातील खानिवडे, घाटेघर, शिरवली, अदने, पारोल, अंबोडे, भटाणे, साईवान, काशीद कोरगाव, कोपरगाव, हेडावडे, चिमणे या गाव, वाड्या, पाड्यातील रहिवाशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. प्रशासन सर्व प्रकारच्या सुरक्षित उपाययोजनांसाठी सज्ज असून प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे जनतेने पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.

लोकल सेवा ढेपाळल्याने स्थानकांवर प्रचंड गर्दी

मुंबईत रविवारी मुसळधार पाऊस झाल्याने आठवड्याच्या पहिला दिवस सोमवारी मुंबईकरांना लोकल गाड्यांच्या विलंबाचा प्रचंड फटका बसला. सकाळी पिकअवरला पाऊसाने जोरदार हजेरी लावल्याने मुंबईकरांची त्रेधातिरपीठ उडाली. पावसाने दृश्यमानता कमी झाल्याने लोकल  सेवा ढेपाळली होती. सायंकाळी देखील पावसाने मध्य रेल्वेच्या लोकल अर्ध्या तास उशीराने धावत होत्या. त्यामुळे कामावरुन घरी जाणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;